
औषधनिर्मिती क्षेत्रातील सुप्रिया लाइफसायन्स लि. या कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक शिवानी वाघ २०१४ पासून कंपनीत कार्यरत असून, कंपनीच्या वाढीला आणि संशोधनाला त्यांनी चालना दिली आहे. कंपनीचे विपणन आणि निर्यातीसंबंधी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या त्या पार पाडतात. त्यांच्या नेतृत्वाखाली, सुप्रिया लाइफसायन्स लि.ने अनेक महत्त्वाचे टप्पे ओलांडले आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद...