
शिल्पा कांबळे
shilpasahirpravin@gmail.com
वैष्णवीचा मृत्यू कसा झाला हे तपासांती कळेलच. पण समाज म्हणून या घटनेवर आपण कसे वागतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरंतर लग्नाकडे प्लॅन बी म्हणून बघायला हवे! लग्न करून बघणार आहे; टिकले तर उत्तमच, नाही तर आत्मक्लेश न करता त्यातून बाहेर पडेन, असा विचार टोकाचा वाटला तरी करणे गरजेचे आहे. विवाह या संस्थेला लाईटली घ्यायची वेळ आली आहे!