
देशभरातील २८ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांतील ४०९२ आमदारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने केला आहे. या आमदारांमध्ये देशभरात केवळ १० टक्के महिला आमदार असून, सर्वच राज्यांमध्ये महिलांना जेमतेम प्रतिनिधित्व मिळत असल्याकडे या अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.