
कल्याणी शंकर
आगामी २०२९ च्या निवडणुकांसाठी लागू होणारे महिलांसाठी आरक्षण हे जनगणना अन् मतदारसंघ फेररचना प्रक्रियेच्या आधारे आकार घेईल. ही प्रक्रिया केवळ तांत्रिक नसून, भारताच्या लोकशाहीला नवीन रूप देणारी ठरू शकते. भविष्यातील
संसद ही अधिक प्रतिनिधिक, समतोल अन् महिला नेतृत्वाची ओळख बनू शकते. १९९२ मध्ये ग्रामपंचायतींपासून सुरू झालेली स्त्री सक्षमीकरणाची चळवळ आता संसद आणि विधानसभांमध्ये पोहोचणार आहे. हे भारतीय लोकशाहीसाठी निश्चितच एक सकारात्मक परिवर्तन आहे.