

World Puppetry Day
esakal
सत्यजित रामदास पाध्ये - satyajitpadhye@gmail.com
दरवर्षी ‘वर्ल्ड पपेट्री डे’ अर्थात बोलक्या बाहुल्यांचा दिवस २१ मार्चला साजरा केला जातो. बोलक्या बाहुल्यांचं जग अनुभवण्याची संधी देणाऱ्या आणि त्यांची साद मनातून थेट हृदयात पोहोचवणाऱ्या शब्दभ्रमकारांच्या कलेचं कौतुक करण्याचा हा दिवस....
मेरिकेतील ‘युनिमा’ अर्थात ‘युनियन इंटरनॅशनल डे ला मॅरिओनेट’ संस्थेला जागतिक पपेट दिन किंवा ‘वर्ल्ड पपेट्री डे’चं श्रेय दिलं जातं. २००३ मध्ये ‘युनिमा’ने बोलक्या बाहुल्यांचा दिवस ठरवला आणि २१ मार्चला दरवर्षी तो साजरा केला जातो. इराणचे पपेट कलाकार जावेद जुल्फाग्री यांनी २००० मध्ये त्याबाबतची कल्पना मांडली आणि आता ‘युनिमा’तर्फे तो जगभर साजरा होतो. ‘युनिमा’ संस्थेची स्थापना १९२९ मध्ये युनेस्कोतर्फे करण्यात आली. ती एक जागतिक दर्जाची संस्था असून जगातील सर्व पपेट कलाकार एकत्र यावेत म्हणून तिची स्थापना झाली. बोलक्या बाहुल्यांच्या कलेचा जागतिक स्तरावर प्रसार व्हावा, असा त्यामागचा उद्देश... म्हणूनच २००३ पासून दरवर्षी वर्ल्ड पपेट्री डे २१ मार्चला साजरा केला जातो.