
डॉ. अरविंद येलेरी
एकीकडे जगाला स्वतःचे सामर्थ्य दाखवू पाहणारा चीन हा देश सध्या अंतर्गत अस्थैर्याच्या वादळातून मार्ग शोधतो आहे. त्यामुळे कारण काहीही असले तरी जिनपिंग यांची ब्रिक्स परिषदेतील अनुपस्थिती ही आधुनिक भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घटना मानली जाते.
आं तरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक महत्त्वाच्या शिखर परिषदांत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे हजेरी लावणे हे जगासाठी सरावाचे झाले असल्याने, ब्राझीलमधील १७व्या ब्रिक्स शिखर परिषदेतील त्यांची अनुपस्थिती धक्कादायक ठरली.