Premium|Yellamma Nimmana Ritual : सौंदत्तीतील ‘निम्माना’ विधीची परंपरा आणि त्यामागील सांस्कृतिक अर्थ

Soudatti Yellamma Temple : सौंदत्तीतील यल्लम्मा देवीच्या परंपरेतील ‘निम्माना’ विधी लोकसंस्कृती, श्रद्धा आणि भारतीय औषधी परंपरेचे प्रतीक मानला जातो. कडुलिंबाच्या वापरातून आरोग्य व अध्यात्माचा सुंदर संगम दिसून येतो.
Yellamma Nimmana Ritual

Yellamma Nimmana Ritual

esakal

Updated on

संजीव भागवत - sanjeev.bhagwat@esakal.com

कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या लोक संस्कृतीत ‘निम्माना’ नावाचा एक अनोखा विधी केला जातो. भारतीय चिकित्साविद्येतील औषधीसूक्तांची प्रतीके या विधीत दिसतात...

सौंदत्तीजवळील मलप्रभेच्या तीरावर आणि यल्लम्मना गुड्डा डोंगररांगांच्या पायथ्याशी सत्यम्मा देवीचे मंदिर आहे. ते यल्लम्मा म्हणजेच रेणुका देवीचेच एक रूप असून तिला जोगळुंबा, जोगरबावी सत्यम्माही म्हटले जाते. या मंदिराच्या शेजारी मोठी पुष्करणी आहे. त्या पुष्करणीला ‘योगरबावी सत्यम्मा कुंड’ नावानेही ओळखले जाते. भारतातील प्राचीन पुष्करणीत तिचे खूप महत्त्व आहे. या पुष्करणीत महिला-पुरुष आंघोळ करून ओल्या कपड्यानेच जोगळुंबा देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतात. महिलांकडून दंडवत घालत ही प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. आंघोळीनंतर कमरेला कडुलिंबाच्या पानाचा डहाळा बांधला जातो. तोंडातही त्याची पाने धरून ती मंदिराच्या मागील बाजूस सोडली जातात. या विधीला ‘निम्माना’ म्हटले जाते. येथे असलेल्या याडी, आराधिनी, जोगतिणी अथवा पुरुष भक्त आपल्या हातात तुणतुणे वाजवत कमरेला कडुलिंबाचा डहाळा बांधलेल्या भक्तांना संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा घालून मागे ते सोडून देतात. या वेळी येथील हातात परडी असलेल्या जोगतिनी यल्लम्मा, रेणुका, सत्यम्मांसह जमदग्नी आणि परशुरामांचाही उदो उदो करतात. जोगतिणी विशिष्ट आवाजात आपले तुणतुणे वाजवत यल्लम्मा, रेणुकेच्या नावाचा गौरव करणारे गाणे म्हणतात. एकूणच हा ‘निम्माना’ विधी पूर्ण केल्यानंतरच भाविक पुढे यल्लम्मना गुड्डा अथवा सिद्धांचल पर्वतात असलेल्या यल्लम्माकडे जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com