

Deenanath Mangeshkar Musical Journey
esakal
नगुबाईचे गाणे ऐकून लहानगे दीनानाथ गुरुजींच्या घरी जायला निघाले, वाटेत त्यांना निसर्गाचे विविध रंग दिसायला लागले, त्यांना त्या वातावरणाने मोहित केले. दीनानाथ यांचा हा सारा प्रवास सांगत आहेत हृदयनाथ. हा सगळा प्रवास त्यांना कथन केलाय लतादीदींनी...
पाऊस नुकताच पडून गेला होता
मी डोंगर चढू लागलो. पावसाच्या थोड्याशा
सरींनी वातावरण मुलायम केले होते.
मृदगंध ही अळुमाळु होता, कारण निर्गंध
कळ्यांना वाऱ्याने निष्कारण झोडपून
त्यांचा सडा खाली पडला होता.
कळ्या निर्गंधच असतात. म्हणजे जो पर्यंत
त्या उमलत नाहीत, तो पर्यंत त्यांना गंध
नसतो. पण ज्या वेळी त्यांचं फुलात
रूपांतर होते, त्या वेळी त्यांचा सुगंध त्यांच्या
भोवती फेर धरतो. सारे वातावरण सुगंधित करतो.
पण कळ्या मात्र या सुगंधात भिजू शकत
नाहीत, कारण त्या फुलाला फुलविण्याच्या
प्रयत्नात विसर्जित झालेल्या असतात आणि त्यात
भर म्हणून की काय पाऊससरींनी कळ्यांना
अकालीच मातीत मिसळविले होते.
त्यामुळे सारे रानमाळ हळवे झाले होते.
तोच आकाशाला कुणीतरी वर उचलले,
आणि मेघातून टप टप पाणी गळले.
मी शहारून वर पाहिले आणि पिंपळपानांच्या