
सुनंदन लेले
sdlele3@gmail.com
भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतले शेवटचे दोन दिवस मी कधीच विसरू शकत नाही. ३ ऑगस्ट रोजी ओव्हल कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला असताना चित्र होते, की विजयासाठी भारताला चार फलंदाज बाद करायचे होते तर इंग्लंडला ३५ धावा करायच्या बाकी होत्या.
ज्या संख्येने या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत धावा झाल्या, त्याचा विचार करता ३५ धावा काहीच नाही, असेच बऱ्याच लोकांना वाटत होते आणि त्यात काही चूक नाही. त्यातून एका कसोटी सामन्यात अफलातून आक्रमक शतकी खेळी करणारा जेमी स्मिथ नाबाद खेळत होता.