Home Buying विकसकांकडून सवलती आणि आटोक्यातले व्याजदर...करा विचार घर घेण्याचा

स्वत:च्या घराचं स्वप्न पाहत असाल किंवा व्यवसायवृध्दीसाठी जागा खरेदी Home Buying करायची संधी शोधत असाल तर ती हीच वेळ आहे. या अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर नव्या घराचं स्वप्न साकारायला हरकत नाही
घर खरेदी
घर खरेदीEsakal

सध्या भारतात गृहनिर्माण किंवा रिअल इस्टेट ला चांगले दिवस आले आहेत. एक तर चांगली घरं कमी किंमतीत किंवा परवडण्या जोग्या किंमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत शिवाय विकसकाकडून घरखरेदीवर काही चांगल्या सवलती देखील मिळू लागल्या आहेत. Affordable Interest rates on bank may facilitate home buying

त्यावर बँकांचे आवाक्यातील व्याज दराने गृहकर्ज Home Loan उपलब्ध करून देणे म्हणजे दुधात साखरच. तेव्हा स्वत:च्या घराचं स्वप्न पाहत असाल किंवा व्यवसायवृध्दीसाठी जागा खरेदी Home Buying करायची संधी शोधत असाल तर ती हीच वेळ आहे. या अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर नव्या घराचं स्वप्न साकारायला हरकत नाही...

अक्षय तृतियेच्या Akshyya Tritiya मुहूर्तावर कोणत्याही नव्या कामाला सुरूवात करण्याची आपली परंपरा आहे. या दिवशी नवीन गोष्टी सुरू करण्याचा प्रघात आहे. या अक्षय्य तिथीला घराचं बुकिंग म्हणूनच मोठ्या प्रमाणावर केलं जाते. मागील काही वर्षात घराच्या किंमतींत एवढी वाढ झाली होती की त्या सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. मात्र आता त्यात बदल होण्याची चिन्हे आहेत. घराच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या नसल्या तरी त्याच बजेटमध्ये आता सगळ्या सुविधांसह घरे उपलब्धता होताना दिसत आहेत. 

हे देखिल वाचा-

घर खरेदी
Home Buying Tips : पत्नीच्या नावे घर घेणं, किधीही फायद्याचंच ठरतं, कसं ते वाचा

घरांसाठी नवा ग्राहक तयार करण्याच्या स्पर्धेत आता नवनवीन योजना देखील आल्या आहेत. इटस्  राईट टाईम टू इनव्हेस्ट असे सध्याच्या काळात कोणत्या क्षेत्राबद्दल म्हणायचे झाले तर ते रिअल इस्टेट हे एक क्षेत्र नक्कीच असेल. कारण या क्षेत्रात अनेक चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत. कधी नव्हे ते या क्षेत्रातल्या किंमती स्थिरावल्या आहेत. काही वर्षापूर्वी त्या सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर वाटत होत्या पण आज त्याच किंमतीत त्यांना घराबरोबर काही अन्य सुविधाही मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

त्यात आवाक्यातील दराने गृहकर्ज उपलब्ध करून देण्याच्या बँकांच्या धोरणामुळे आता घराचं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणं शक्य झालं आहे. याचा एक चांगला परिणाम असा झाला आहे की आजवर किंमतीकडे पाहून घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलत होते त्यांना आता घर घेण्याची एक चांगली संधी निर्माण झाली आहे. स्वत:चं घर घेण्याचा निर्णय घेणार्यांसाठी ही वेळ चांगली आहे असं म्हणायला हवं. 

नोटबंदी, जीएसटी, रेरा, कोरोना या व अशा स्थित्यंतरानंतर बांधकाम क्षेत्रात आता स्थैर्य आले आहे. तसेच घरखरेदी आता खर्या अर्थाने सुरक्षित आणि ग्राहकाभिमुख झाली आहे. घरांच्या किंमती आता आवाक्यात येताना दिसत आहेत. 

त्याचसोबत आवाक्यातील घर कर्जा सोबत प्रोसेसिंग फी न आकारणे, प्री पेमेंट पेनल्टी न आकारणे अशा काही अन्य उपायांनी जास्तीत जास्त गृहकर्ज वितरणाचा बँकांचा प्रयत्न असलेला दिसतो आहे. या सगळ्याचा परिणाम गृह खरेदीसाठी पूरक काळ आलेला दिसतो आहे. या संधीचा फायदा त्यांनी जरूर घ्यायला हवा. या अक्षय्य मुहूर्तावर त्याची सुरूवात करायला काहीच हरकत नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com