Cheque Bounce Rules : तुम्ही दिलेला चेक बाऊंस झाला तर तुरूंगाची हवा खावी लागते का? काय आहे नियम

चेक बाऊंस झाल्यास काय करावं? क्लिक करून वाचा
Cheque Bounce Rules
Cheque Bounce Rules esakal

Cheque Bounce Rules : आजच्या काळात ऑनलाइन व्यवहार झपाट्याने वाढत आहेत. पण अजूनही बरेच लोक आहेत जे चेकद्वारे पैसे भरण्यास प्राधान्य देतात. मोठ्या व्यवहारांसाठी फक्त धनादेशांचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत, तुम्ही चेकद्वारे पेमेंट फार काळजीपूर्वक केले पाहिजे. कारण चेक भरताना खूप काळजी घ्यावी लागते.

थोड्याशा चुकीमुळे चेक बाऊन्स होऊ शकतो आणि चेक बाऊन्स झाल्यास तुम्हाला दंडही भरावा लागू शकतो. काही परिस्थितींमध्ये तुरुंगवासही खावा लागतो. जर तुम्हीही चेकबुक वापरत असाल आणि तुमचा चेक कधीही बाऊन्स होत नसेल, तर तुमच्यासाठी त्याचे नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Cheque Bounce Rules
Bank Account : बँकेशी संबंधित हे नियम माहीत असायलाच हवेत

अनेक कारणांमुळे चेक बाऊंस होऊ शकतो. जसे की, खात्यावर पैसे नसणे, सही चुकीची असेल किंवा नाव चुकले असेल यामुळे चेक बाऊंस होतो. तसेच,  कालमर्यादा संपणे, चेकर्सचे खाते बंद होणे, चेकवर कंपनीचा शिक्का नसणे, ओव्हरड्राफ्ट मर्यादा ओलांडणे इत्यादी कारणांमुळे चेक बाऊन्स होऊ शकतो.

कोणत्याही परिस्थितीत चेक बाऊन्स झाल्यास बँक त्याचा दंड तुमच्या खात्यातूनच कापून घेते. चेक बाऊन्स झाल्यावर, कर्जदाराला बँकेला कळवावे लागते, त्यानंतर त्या व्यक्तीला एका महिन्याच्या आत पैसे भरावे लागतात.

Cheque Bounce Rules
Banking Crisis: बँकिंग संकटावर रघुराम राजन यांचा सूचक इशारा; म्हणाले, आर्थिक परिस्थिती...

चेक बाऊंस झाल्यास काय करावे

चेक बाऊन्स झाल्यास बँका त्यांच्या ग्राहकांकडून दंड वसूल करतात. हा दंड कारणांनुसार वेगळा असू शकतो. हे शुल्क वेगवेगळ्या बँकांसाठी वेगवेगळे आहेत. हा दंड 150 ते 750 रुपये किंवा 800 रुपयांपर्यंत असू शकतो.

2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा धनादेशाच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात. जेव्हा चेक देणाऱ्याच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते आणि बँक चेकचा अनादर करते तेव्हा त्याच परिस्थितीत हे घडते.

खरचं तुरूंगवास होऊ शकतो का?

चेक बाऊन्स होणे हा भारतीय संविधानानुसार गुन्हा मानला जातो. धनादेश बाऊन्स झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जदार धनादेश भरू शकला नाही, तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते.

१५ दिवसांत या नोटीसचे उत्तर मिळाले नाही, तर अशा व्यक्तीविरुद्ध 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 1881' च्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कर्जदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दंड होऊ शकतो किंवा त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्हीची तरतूद आहे.

Cheque Bounce Rules
Vastu Rules for Mirrors: बाथरुममध्ये आरसा लावताय मग या नियमांचा विचार नक्की करा, होतील अनेक फायदे

चेक बाऊंस झाल्यावर काय होतं

तुम्हाला एखाद्याने दिलेला चेक बाऊन्स झाला असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात खटला दाखल करू शकता. कलम १३८ नुसार संबंधितावर न्यायालयात तक्रार दाखल केली जाऊ शकते. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला चेकवरील रकमेच्या दुप्पट रक्कम दंड स्वरुपात द्यावी लागू शकते किंवा २ वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे.

कायदेशीर तक्रार दाखल करण्यासाठी चेक बाऊन्स झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कायदेशीर नोटीस द्यावी लागते. नोटीस मिळाल्यानंतर आरोपींना १५ दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतरही धनादेशाची रक्कम न दिल्यास १६ व्या दिवसांपासून ३० दिवसांच्या आत न्यायालयात तक्रार द्यावी लागते.

त्यानंतर न्यायालय त्यावर निर्णय घेते. यासोबतच चेक दिल्यानंतर ‘स्टॉप पेमेंट’ केल्यास चेक देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. संबंधित व्यक्तीविरोधात कलम ४२०, ४६७, ४६८ नुसार गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे कोणताही चेक देण्यापूर्वी अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

तुरूंगवास भोगावा लागतो का?

चेक बाऊन्स होणे हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा मानला जातो. धनादेश बाऊन्स झाल्यानंतर एक महिन्याच्या आत कर्जदार धनादेश भरू शकला नाही, तर त्याच्या नावावर कायदेशीर नोटीस बजावली जाऊ शकते. त्यानंतर १५ दिवसांत या नोटीसचे उत्तर मिळाले नाही.

तर अशा व्यक्तीविरुद्ध 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट 1881' च्या कलम 138 अन्वये गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. कर्जदारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दंड होऊ शकतो किंवा त्याला दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो किंवा दोन्हीची तरतूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com