Sonam Kapoor New Home : नवमीच्या मुहूर्तावर सोनम कपूरचा नव्या घरात गृहप्रवेश; पाहा तिच्या घराची झलक

नवरात्रीच्या नवमीला अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे.
sonam kapoor
sonam kapooresakal

Sonam Kapoor New Home : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नवरात्रीनिमित्त नुकतीच तिने तिचे वडिल अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत दुर्गापूजेच्या पंडालला हजेरी लावली होती. यावेळी तिच्या रेड ड्रेसची आणि लूकची चांगलीच चर्च झाली होती. आता सोनम तिच्या नव्या घरामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

मागील काही दिवसांपासून सोनम मुंबईमध्ये तिच्या नव्या घराचा शोध घेत होती. अखेर तिला तिचे नवे घर मिळाले असून महानवमीच्या मुहूर्तावर सोनम, तिचा पती आनंद आहुजा आणि त्यांचा मुलगा वायूसोबत या नव्या घरात शिफ्ट झाली आहे.

sonam kapoor
स्टाईल शिकावी तर सोनमकडून.. कपूरकन्येचा हटके लूक पाहिलात का? Sonam Kapoor

नवरात्रीच्या नवमीला सोनम कपूरने तिच्या नव्या घरात गृहप्रवेश केला. या संदर्भातली खास पोस्ट तिने २३ ऑक्टोबरला (सोमवारी) इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या नव्या अलिशान घरात काढलेले तिचे फोटो शेअर केले आहेत.

या पोस्टला तिने कॅप्शन देत म्हटलयं की, 'आम्ही या आठवड्यात आमच्या नव्या घरात शिफ्ट झालो आहोत. आमची सर्वांचे मने आनंदाने आणि आशेने भरलेली आहेत. आता आम्ही या नव्या घरात नव्या आठवणी बनवण्यासाठी प्रतिक्षा करू शकत नाही' अशा सुंदर शब्दांमध्ये सोनमने ही पोस्ट शेअर केली आहे.

सोनमने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या नव्य घराची झलक दिसून येत आहे. या फोटोंमध्ये सोनम खिडकीजवळ असलेल्या एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिच्या नव्या घराच्या भिंतींवर प्राचीन भारतीय कारागिरीचे काम केलेले दिसून येत आहे. एखाद्या राजवाड्याप्रमाणे तिच्या या नव्या घराचा लूक दिसून येत आहे.

सोनमने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सोनमचा सोबर आणि सिंपल लूक दिसून येत आहे. तिने ब्लश पिंक कलरच्या टोनचा डिझायनर सूट परिधान केला असून या ड्रेसवर गोल्डन वर्क केलेले दिसत आहे. या सूटवर तिने मॅचिंग झुमके कानात घातले आहेत. यासोबतच तिने सिंपल सॉफ्ट मेकअप करत तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये सोनम खूपच सुंदर दिसत आहे.

sonam kapoor
Sonam Kapoor : अभिनेत्री अन् तिच्या पतीनं 'युट्युबर' ला शिकवला धडा, पाठवली कायदेशीर नोटीस, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com