चांगल्या किचनसाठी ग्राहक संवाद महत्त्वाचा...kitchen good Customer interaction important | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किचन

चांगल्या किचनसाठी ग्राहक संवाद महत्त्वाचा...

मागील भागात आपण किचनमधील आपला वावर, काम अधिक सोपे व सुसह्य होण्याच्या दृष्टीने किचन लेआऊटची गरज आणि त्याचे प्रकार पाहिले. आजच्या भागात आपण डिझाईनबद्दल जाणून घेऊयात.

फाईव्ह झोन डिझाईन प्रिन्सिपल

किचनमधील रेफ्रिजेरेटर, सिंक आणि कुकिंग या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्या ऑर्गनाईज्ड असण्यासाठी १. कन्झ्युमेबल, २. नॉन-कन्झ्युमेबल,३. क्लीनिंग, ४. प्रिपरेशन आणि ५. कुकिंग या पाच झोन्सच्या आधारे किचन डिझाईन करून दिले जाते.

यामुळे किचनमधील कामाच्या वेळेत किमान सुमारे २५ टक्के वेळेची बचत होऊ शकते. यासाठीचा अभ्यास करून भारतीय पद्धती, सवयी आणि किचनची रचना करण्यात ‘किचन डेकॉर’ने पारंगतता मिळविली आहे. या पाच झोन प्रिन्सिपल्सबाबत थोडे विस्ताराने जाणून घेऊयात.

कन्झ्युमेबल झोन : या झोनमध्ये किचनमधील आवश्यक गोष्टी - जसे भाज्या, चटण्या, धान्य, रेफ्रिजेरेटर, पॅंट्री युनिट या गोष्टींचा समावेश असतो. येथे साठवणुकीच्या कालावधीनुसार स्टोअरेजचा आकार कमी-अधिक ठेवता येऊ शकतो

नॉन-कन्झ्युमेबल झोन : या झोनमध्ये भांडी व इतर अॅक्सेसरीज ठेवलेल्या असतात.

क्लीनिंग झोन : या झोनमध्ये सिंक, डिश वॉशर आणि वॉटर प्युरिफायर यांचा समावेश असतो. स्वयंपाकघरात पाण्याचा जो वापर होणार आहे, तो याच भागात होईल.

प्रिपरेशन झोन : या झोनमध्ये स्वयंपाकासाठीची पूर्वतयारी जसे की चिरणे, कापणे इत्यादी केले जाते.

कुकिंग झोन : या झोनमध्ये हॉब, ओव्हन, मायक्रोव्हेव इत्यादी गोष्टी असतात. येथे स्वयंपाक करून तो आपण सर्व्ह करू शकतो. या पाच टप्प्यांत आपण किचनची आखणी केल्यास स्वयंपाक करण्याचा किंवा किचनमधील आपला वेळ सुमारे २५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

किचनसाठी आयडियल साईज

चार सदस्यांच्या कुटुंबासाठी ८ x १० फुटांचे पॅरलल किचन पुरेसे ठरू शकते. मात्र अधिक सदस्य असणाऱ्या कुटुंबांसाठी

२० x १६, १८ x १४ फुटांची मॉडर्न आयलंड किचन आदर्श ठरतात.

ग्राहकांचा संवाद महत्त्वाचा

किचनमधील अत्याधुनिक सुविधांमध्ये पॅँट्री युनिट व त्याचे ऑप्शन्स, वरच्या बाजूस केल्या जाणाऱ्या स्टोअरेजसाठी मोटराईज्ड लॉफ्ट्स, ओट्यासाठी आर्टिफिशियल सिंथेटिक स्टोन अशा नव्या सुविधा आज उपलब्ध आहेत. नव्या साधनांमध्ये मायक्रोवेव्ह, ओव्हन, इन्स्टन्ट गीझर, इनबिल्ट डिश वॉशर अशा साधनांचा समावेश करता येऊ शकतो.

त्यामुळेच किचनमधील साधनांसोबत त्यांचे डिझाईन, त्यांची कार्यक्षमता विचारात घेता ग्राहकांनी किचन किंवा होम डेकॉरसाठी आपले बजेट किती आहे, याची स्पष्ट कल्पना सुरुवातीलाच द्यायला हवी. जेणेकरून गरजांनुसार किचनचे डिझाईन, त्यातील साधने यांचे नियोजन करता येईल. यासाठी संवाद साधणे आवश्यक आहे.

किचनसाठी तज्ज्ञांचा सल्ला

किचन हा प्रत्येक घरातील सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने ज्या प्रकारे प्लंबिंग, इलेक्ट्रिकल आणि आरएसी कन्सल्टंटची मदत घरबांधणीच्या वेळी घेतली जाते, त्याप्रमाणे किचनचे घरातील महत्त्व लक्षात घेऊन किचन कन्सल्टंट या संकल्पनेचा स्वीकार करीत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जावी. ही काळाची गरज आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांनीही या संकल्पनेचा आग्रह धरावा, असे आवाहन मी करू इच्छितो.

शब्दांकन : नरेंद्र जोशी

(क्रमशः)