चांगले घरमालक होण्याच्या टिप्स; घर Rental देण्यापूर्वी अशी करा तयारी

आपण जरी घरमालक House Owner असलो तरी आपण कोणाला तरी रहायला 'घर' देतोय ही गोष्ट कायमच ध्यानात ठेवली पाहिजे. याच वेळेला घर भाड्याने देणे ही एक कायदेशीर गोष्ट आहे हे देखील लक्षात ठेवावे
How to rent out your home
How to rent out your homeEsakal

घरमालक म्हटले की घरभाड्याची विचारणा करणारा आणि भाडेकरूंना सूचना देणारी खडूस व्यक्ती असे चित्र डोळ्यासमोर येते. ही प्रतिमा आता मात्र बदलत चालली आहे, कारण घरांची संकल्पनाच बदलली आहे. Know The Legal Aspects Before giving home on rent

पूर्वी स्वतंत्र घरे असतांना घरमालक आणि भाडेकरू एकाच ठिकाणी असायचे. फ्लॅट Flats संस्कृती अस्तित्वात आल्यापासून परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली.

घरमालक Home Owner आणि भाडेकरू Tenant वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागले. फ्लॅट आता एक गुंतवणुकीचे साधन झाल्यापासून तर परदेशात घरमालक असणे ही तर अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे.

आपण जरी घरमालक House Owner असलो तरी आपण कोणाला तरी रहायला 'घर' देतोय ही गोष्ट कायमच ध्यानात ठेवली पाहिजे. याच वेळेला घर भाड्याने देणे ही एक कायदेशीर गोष्ट आहे हे देखील लक्षात ठेवावे. घरमालक होणे हा उत्पन्नाचा भाग आहे, तसेच ती समाजसेवा देखील आहे.

शहरीकरणामुळे घरांची संख्या वाढली आहे. त्याचप्रमाणे वेगळ्या वेगळ्या शहरांतली लोकसंख्या देखील वाढली आहे. आणि म्हणूनच घरमालकांना आता मोठी मागणी आहे. भाड्याने घर देणे ही उत्तमच संकल्पना आहे, पण त्या आधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

हे देखिल वाचा-

How to rent out your home
Flat खरेदी करण्यापूर्वी कार्पेट एरिया आणि बिल्ट अप एरिया हे आधी समजून घ्या !

कायदेशीर बाबी

आपल्याकडे जागा आहे आणि आपण ती भाड्याने देतोय इतकीच बाब पुरेशी नसते. त्यासाठी अनेकविध गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जर चांगले घरमालक व्हायचे असेल, तर गुंतवणुकीतून चांगले रिटर्न्स मिळतील याची दक्षता घ्यावी.

पण त्यासाठी कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करावी याचे भान ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. कोणत्याही ठिकाणी जागा असल्यास ती भाड्याने घेणारच या भ्रमात राहू नये. त्यासाठी सुयोग्य जागा बघावी.

एखादा फ्लॅट घेतांना तो गुंतवणूक म्हणून घेतोय की भविष्यात तेथे रहायला जाणार आहोत याचा विचार करून ठेवावा. त्यानुसारच जागा घ्यावी. तसेच घर भाड्याने देतांना सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्या. यावरून आपली विश्वासार्हता ठरणार आहे हे लक्षात घ्यावे. तसेच इतर सर्व नियमांची नीट माहिती करून घ्यावी.

जागा

घर घेतांना ते कोणत्या जागी आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे असते. आपण केलेल्या गुंतवणुकीचे चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी योग्य जागा शोधणे गरजेचे ठरते. घर फक्त भाड्याने द्यायचे असल्यास स्वतःपेक्षा भाडेकरूंच्या गरजांचा जास्तच विचार करावा.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या गरजांचा विचार करावा. आपण घेतलेल्या जागेपासून शाळा, कामाची जागा, जवळ असल्याची खात्री करावी. स्टेशन पासून जवळ असल्यास अजूनच चांगले.

बाहेरून येणाऱ्या शहरांतल्या लोकांसाठी कामाची जागा जवळ असणे सोयीचे असते. त्यामुळे त्यांची मागणी वेगळी असते. तेव्हा जागा घेतांना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा.

किंमत

घरभाडे ठरवतांना बाजारपेठेचा अभ्यास करावा. आपण ठरवलेल्या किंमतीशी भाडेकरू सहमत असणार नाही हे गृहीतच असते. तेव्हा अवास्तव भाडे सांगू नये. बाजारपेठेशी सुसंगत असा दर ठरवावा.

तसेच करारपत्र करतांना आपण स्वतः तेथे उपस्थित रहावे, त्यातील तरतुदीविषयी देखील सजग असावे. त्या अति जाचक किंवा अति शिथिल होत नाही ना याची काळजी घ्यावी. घर भाड्याने दिल्यावर अधूनमधून भेट द्यावी.

भाडेकरूंची चौकशी करावी. त्याचप्रमाणे घर व्यवस्थित असल्याची खात्री करावी. आणि भाडेकरूंशी मित्रत्वाचे नाते निर्माण करा. कारण काही काळासाठी का होईना भाडेकरू आपल्या घराचे रक्षणकर्ते असतात हे विसरून चालणार नाही.

हे देखिल वाचा-

How to rent out your home
Buy Flat : तूम्हीही Flat खरेदी करताना ‘या’ गोष्टी तपासल्या का?, लगेच बघा नाहीतर...

भाडेकरूंची निवड

हा सगळ्यात काळजीचा भाग असतो. दिवस रात्र एक करून घेतलेले घर अनोळखी व्यक्तीला भाड्याने देणे कर्मकठीण असते. तेव्हा त्यांची निवड करतांना भरपूर दक्षता घ्यावी. निवड करतांना त्याची संपूर्ण माहिती मिळवावी.

त्यावर कोणता गुन्हा तर दाखल नाही याची खात्री करावी. शक्यतो घर भाड्याने देतांना एजंटला  व्यवहार करायला देणे टाळावे. निवड स्वतःच करावी. जेणेकरून भविष्यात सर्व जबाबदारी मालकाची असेल. तसेच भाडेकरूंची पुर्ण माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी.

ह्या नियमाला अनेक जण फाटे देतात. पण त्यामुळे मालकाची बाजूच सुरक्षित होण्यास मदत होते. मोठ्या शहरात वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता, माहिती देणे सोयीस्कर ठरते.

सुविधा

घर भाड्याने देतांना घर फार सजविण्याची आवश्यकता नसते, पण राहण्यायोग्य असावे याची काळजी घ्यावी. पाणी, वीज, यासारख्या सुविधा पुरवाव्यात. सोसायटी नवीन असल्यास या सुविधा उपलब्ध झाल्यावरच घर भाड्याने द्यावे.

तसेच घर गळती, यासारख्या समस्या नसल्याची खात्री करावी. हे केल्यास भाडेकरू तुमचे दार सारखे ठोठावणार नाहीत. अजून एक दक्षता म्हणजे भाड्याने घर देतांना तेथे खूप फर्निचर नसावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com