सोसायटीच्या सोयींसाठी असा प्लॅन करा Maintenance Charge

ज्या काळी सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबतचे Housing Societe's कायदे अस्तित्वात आले म्हणजे १९६० च्या दशकात एक-दोन इमारतींचा प्रोजेक्ट गृहीत धरूनच हे कायदे तयार झाले म्हणून त्यात सभासदांकडून देखभालीसाठी वर्गणी कशी आणि किती घ्यावी यावर चर्चा फारशी झालेली आढळत नाही
सोसायटी मेन्टेनन्स
सोसायटी मेन्टेनन्सEsakal
Updated on

सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या देखभालीसाठी सभासदांकडून कशा तऱ्हेने वर्गणी गोळा केली जावी यावर अनेक विचार मांडलेले आहेत. आता टाऊनशिपचा Township जमाना आलेला आहे आणि इमारतींच्या आजूबाजूला बागा Gardens, त्यांत लहान मुलांच्या खेळण्यासाठी विविध सोयी, जलतरण तलाव, अद्ययावत व्यायामशाळा Gym अशा अनेक सोयी त्यात अंतर्भूत होत असतात. अर्थात, या खर्चाचा भार हा सदनिका Flats ग्राहकांच्या खिशावरच पडत असतो आणि म्हणूनच 'सुपर बिल्ट अप'चे व्यवहार रूढ पावले गेले होते. Society Maintainance Issue know about Minimal Plan

महाराष्ट्र सरकारने सदनिका विक्रीचे Flats Sale व्यवहार केवळ 'कारपेट एरिया' म्हणजे चटई क्षेत्रफळावर करण्याचा कायदा केलेला आहे. आता भविष्यात यावर कोणती पळवाट काढली जाते ते काळच ठरवेल.

आज आपल्याला खरे तर कर्जे Loans मिळतात म्हणून 'घर' घेणे सहजसाध्य होते; परंतु नंतर गृहकर्जाचे हप्ते EMI आणि सोसायटीचा मेन्टेनन्स भरणे मात्र जड होते. अफाट पगार मिळवणारे आणि सर्वसाधारण उत्पन्न असलेले असे आर्थिकदृष्ट्या दोन टोकांवरचे लोक एकाच सोसायटीत राहत असतात आणि एक बाजू कितीही वर्गणी सोसायटी घेऊ दे; पण आम्हाला चैनीत राहावयास पाहिजे अशी त्यांची भूमिका असते, तर दुसऱ्या टोकाला कमीत कमी मेन्टेनन्स खर्च ठेवा अशी बाजू मांडतात.

खरे तर वीज, पाणी आणि स्वच्छता Cleanliness अशा तीन महत्त्वाच्या सोसायटीच्या गरजा सोडल्या, तर त्यानंतर 'सुरक्षा व्यवस्था'ही त्या खालोखाल महत्त्वाची गोष्ट असते; परंतु जो काही खर्च वाढत राहतो तो जलवितरणाची सोय, क्लब हाऊस, जीम, गार्डन, सोना बाथ अशा गोष्टींचाच असतो.

हे देखिल वाचा-

सोसायटी मेन्टेनन्स
Society Redevelopment : पुनर्विकासातून पालटले सोसायटीचे रूपडे

ज्या काळी सहकारी गृहनिर्माण संस्थेबाबतचे Housing Societes कायदे अस्तित्वात आले म्हणजे १९६० च्या दशकात एक-दोन इमारतींचा प्रोजेक्ट गृहीत धरूनच हे कायदे तयार झाले म्हणून त्यात सभासदांकडून देखभालीसाठी वर्गणी कशी आणि किती घ्यावी यावर चर्चा फारशी झालेली आढळत नाही; मात्र या विषयावर सभासदांनी जागृत राहून मार्ग काढणे गरजेचे आहे.

कधी काळी सोसायटीतील प्रवृत्ती अशी असते, की मॅनेजमेंट कमिटी ही आपली मते सभासदांवर लादू पाहते. या दबावासाठी सोसायटीचे बरेच सभासद जरी नाराज असले, तरी ते स्पष्टवक्तेपणा दाखवत नाहीत, जे काही स्पष्टवक्ते असतील त्यांची 'खरी' बाजू समजावून न घेता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वरील सर्व गोष्टींसाठी जर वापरासाठी प्रति उपभोगता एक निश्चित दर  किंवा खर्चानुसार चार्ज ठेवून निराळी सोय केली, तर सोसायटीच्या सर्वसाधारण सभासदांवर नाहक भर पडणार नाही.

शिवाय वीज, पाणी, लिफ्ट, साफसफाई आणि सुरक्षा व्यवस्था त्यासाठीचाच खर्च जर सर्व सभासदांवर समान प्रमाणात विभागला, तर कितीही मोठी सोसायटी असली, तरी प्रत्येक सभासदाला या सोसायटीतील मूलभूत गरजांसाठी प्रतिमहा रु.१००० ते १५०० इतक्या प्रमाणातच खर्चाचा देखभालीपोटीचा भार पेलावा लागेल.

मध्यमवर्गीय आणि निवृत्त अशी बरीच कुटुंबेही Families मोठमोठ्या सोसायट्यांत राहतात आणि मेन्टेनन्स चार्जेसबाबत त्यांची नेहमी नाराजी असते; कारण असे चार्जेस अवास्तवपणे घेतले जातात. बऱ्याच वेळा मॅनेजमेंट कमिटी ही काटकसरीने कारभार कसा चालवता येईल याबाबत गंभीरपणे अभ्यास करीत नाही. मात्र सर्वांनी यावर विचार करणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com