महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ
१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्थापनेच्या वर्षीच बॉम्बे हाउसिंग बोर्डचे रूपांतर 'महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ' या संस्थेत झाले. महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाने मुंबई आणि पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी स्वयंपूर्ण घरांच्या विविध योजना राबवल्या. मंडळाने सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेत मुंबईसह पुणे, औरंगाबाद, सोलापूरसारख्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या वसाहती बांधल्या.