esakal | इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड सायन्स ला 'स्वायत्त महाविद्यालया'चा दर्जा
sakal

बोलून बातमी शोधा

Indira College of Commerce and Science has the status of Autonomous College

महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न राहून नवीन अभ्यासक्रम निर्मिती आणि परीक्षा पध्दती राबविण्यासाठी महाविद्यालयाला स्वातंत्र्य मिळणार आहे. हा दर्जा पुढील १० वर्षासाठी असेल, अशी माहिती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन पवार आणि उपप्राचार्य प्रा. शिवेंदू भूषण यांनी दिली.

इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँण्ड सायन्स ला 'स्वायत्त महाविद्यालया'चा दर्जा

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : श्री चाणक्य एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) 'स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा दिला आहे.अयोगाकडून देण्यात येणारे मान्यता पत्र नुकतेच महाविद्यालयालास मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
महाविद्यालयाला स्वायत्ततेचा दर्जा मिळाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न राहून नवीन अभ्यासक्रम निर्मिती आणि परीक्षा पध्दती राबविण्यासाठी महाविद्यालयाला स्वातंत्र्य मिळणार आहे. हा दर्जा पुढील १० वर्षासाठी असेल, अशी माहिती  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन पवार आणि उपप्राचार्य प्रा. शिवेंदू भूषण यांनी दिली.

इंदिरा महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये ठामपणे उतरू शकतील, असा आशावाद संस्थेच्या संस्थापिका डॉ. तरिता शंकर यांनी व्यक्त केला. आजच्या जागतिकीकरणाच्या व औद्योगिकीकरणाच्या स्पर्धात्मक काळामध्ये विद्यार्थ्यांना अधिक सक्षम करण्यासाठी नवनवीन अभ्यासक्रम राबविणे, उदयोग समूहांबरोबर सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देणे, स्वायत्त दर्जामुळे शक्य होणार आहे. स्वायत्ततेमुळे महाविद्यालय व औद्योगिक जगत यांच्यामधील ज्ञानाची दरी नक्कीच कमी होईल व विद्यार्थ्यांना नोकरीच्या, व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त होतील, असे डॉ. पवार यांनी नमूद केले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षापासून बी.एस्सी.आय.टी.(सायबर सेक्युरिटी) , बी.सीए.(सायन्स), बी.बी.ए.(हॉस्पिटॅलिटी व टुरिझम मॅनेजमेंट), बी.कॉम.(फायनान्सीएल मार्केटस्), बी.ए.(हयुमॅनिटीज) व अॅडव्हान्स डिप्लोमा (सायबर सेक्युरिटी, फॉरेन्सिक अकांऊटींग, फ्रॉड डिटेक्शन व रिस्क मॅनेजमेंट) हे अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांना तात्पुरता दिलासा ; पुढच्या वर्गात प्रवेश मिळाला पण...

Edited by : Sharayu Kakade

loading image