#BappaMorya स्‍मिता समवेत सेल्फी, आरती, अन् गप्पा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - ‘आपण बाप्पाचे स्वागत दिमाखात करतो, हा उत्सवही तितकाच जोरदार होतो. या उत्सवातील गणपती जर इको फ्रेंडली असेल तर त्यामुळे पर्यावरणासही हानी होणार नाही,’’ अशी भावना अभिनेत्री स्मिता गोंदकर हिने व्यक्त केली.

सकाळ सोसायटी गणपती स्पर्धेत गोंदकर हिने कोथरूड, सिंहगड रस्ता आणि नऱ्हे येथील सोसायट्यांना भेट दिली. तसेच या सोसायट्यांतील रहिवाशांबरोबर गणेशोत्सव साजरा केला. या वेळी रहिवाशांबरोबर सेल्फी घेत हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. या स्पर्धेमध्ये स्मिताने मुख्य परीक्षक म्हणून भाग घेतला होता. या भागातील विविध सोसायट्यांना भेट देत गणपती सजावटीची पाहणी केली.

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी वेद-विहार सोसायटी, सन-एम्पायर सोसायटी, शिवसागर सिटी सोसायटी, तक्षशिला सोसायटी व ग्रीन व्हॅली सोसायटीने भाग घेतला. या सोसायट्यांमधील बाप्पांची आरती स्मिताच्या हस्ते करण्यात आली. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी’ आणि ‘सोनाटा गणेशोत्सव ॲप’ या उपक्रमाचे सहप्रायोजक आहेत.

वेद-विहार सोसायटी 
कोथरूड - स्मिताच्या हस्ते मंडळाच्या गणेशाची आरती करण्यात आली. मंडळाच्या अध्यक्षा मनीषा जाधव आणि लोकमान्य मल्टिपर्पजचे सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे या वेळी उपस्थित होते.

सन-एम्पायर सोसायटी 
सिंहगड रस्ता - मंडळाने शाडूच्या गणपती बनविण्याची स्पर्धा घेतली; तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंडळाचे अध्यक्ष कपिल कुलकर्णी उपस्थित होते.

शिवसागर सिटी 
सिंहगड रस्ता - मंडळाने कोंढाणे लेणीचा देखावा साकारला आहे. यातून ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा संदेश देण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष महेश बिडकर उपस्थित होते. 

तक्षशिला सोसायटी
नऱ्हे - मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणारे विविध कार्यक्रम गणेशोत्सवात घेतले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष अजय सानगावकर उपस्थित होते.

ग्रीन व्हॅली सोसायटी 
नऱ्हे - मंडळाने पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या स्पर्धांचे आयोजन केले होते. लहान मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष अतुल कुदळे उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #BappaMorya Ganeshotsav Aarti Smita Gondkar