पुणे : वैशिष्ट्यपूर्ण देखावे सादर करतानाच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करणाऱ्या पुणे स्टेशन येथील गणेशोत्सव मंडळांनी यंदाही ही परंपरा सुरू ठेवली आहे. यंदा काही मंडळांनी काल्पनिक देखावा आणि साधेपणावर भर दिला आहे. मात्र, सामाजिक कार्यावर अधिक भर दिल्याचे चित्र आहे.
पुणे स्टेशन येथील निळकंठेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा 'राधाकृष्ण महल' हा वैशिष्ट्यपूर्ण देखावा सादर केला आहे. हा देखावा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. मंडळामार्फत वर्षभर विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविण्यात येतात.

ढोले पाटील रस्ता येथील तरुण विकास सार्वजनिक मंडळ ट्रस्टने यंदा आकर्षक पद्धतीचा 'गणेश महल' तयार केला आहे. याबरोबरच मंडळाने संतांच्या कार्याची माहिती देणारे प्रदर्शनही भरविले आहे. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी, संत नामदेव यांसारख्या संतांच्या जीवनकार्याची आणि त्यांच्या वचनांची माहिती दिली आहे. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीव कायम ठेवत 'पाणी वाचवा, पाणी जिरवा', 'वीज वाचवा', 'वृक्षतोड थांबवा', 'पर्यावरणाचे संरक्षण करा' असे फलक लावून जनजागृती करण्यावरही भर दिला आहे. मंडळाने ग्रंथालय, वाचनालय व वसतिगृहाद्वारे सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे.
मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (ताडीवाला रोड) परिसरातील बहुतांश मंडळांनी साधेपणावर भर दिला आहे. त्यासोबतच गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप, रुग्णांना मदत, महिलांची आरोग्य तपासणी आदी उपक्रम मंडळांतर्फे राबविले जातात. नवमहाराष्ट्र तरुण मंडळाने यंदा गणेश महल तयार केला आहे. प्रायव्हेट रोडवरील भीमशक्ती मित्रमंडळ, एकजूट मित्रमंडळ, नवचैतन्य मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ, एकता प्रतिष्ठान, सिद्धिविनायक मित्रमंडळ, आनंद मित्रमंडळ, जनसेवा मित्रमंडळ, ललकार मित्रमंडळ, सिद्धेश्वर मित्रमंडळ, न्यू व्यापारी मित्रमंडळ, भीमसेवा मित्रमंडळ, पंचशील चौकातील राजे मित्रमंडळ, लडकतवाडीतील श्री विघ्नेश्वर मित्रमंडळ यांनी यंदा साधेपणावर भर दिला आहे.
आवर्जून पहावे असे देखावे