'प्लास्टिक द्या, नाणी घ्या...'ला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 सप्टेंबर 2017

पुणे : प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक असून त्यातून अनेक समस्या निर्माण होत आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी 'सकाळ', पुणे महापालिका आणि 'ग्रीनी द ग्रेट' यांनी सुरू केलेले 'प्लास्टिक द्या, नाणी घ्या...' हा उपक्रम स्तुत्य आहे. याद्वारे लोकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व कळेल,'' अशी प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदवली आहे.

गणेशोत्सवात सुरू केलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

मानाचा पहिला कसबा गणपती मंडळ आणि सदाशिव पेठेतील अखिल हत्ती गणपती मंडळाच्या ठिकाणी हा उपक्रम सुरू असून, त्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांना दिला जात आहे. 

शाळेमध्ये नेहमीच स्वच्छतेबाबत शिकवले जाते. त्यानुसार आम्ही घरात आणि शाळेतही स्वच्छता राखतो. या उपक्रमाद्वारे मात्र, सामाजिक स्तरावर काम करायची संधी मिळत नाही, याचा अभिमान वाटतो. 
- शिवानी अल्ले

'सकाळ'ने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून, याद्वारे प्लास्टिकविषयी नागरिकांमध्ये जागृती होत आहे. उत्सव काळात अनेक ठिकाणी प्लास्टिकचा कचरा साठतो. याद्वारे उपक्रमातून नागरिकांना प्लास्टिकचा कचरा किती घातक आहे आणि त्याचा वापर कसा व कितपत करावा, याचे महत्त्व पटले आहे. 
- वृषाली वडनेरकर 

प्लॅस्टिकपासून मुक्ती मिळवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्‍यकता आहे. प्लॅस्टिकची योग्य विल्हेवाट लावावी, याबाबत जनजागृती झाली पाहिजे. या आगळ्या-वेगळ्या प्रयोगामुळे नक्कीच बदल घडेल. 
- नेहा बंडेवार 

सण-उत्सवाच्या काळात नागरिक रस्त्यावरच प्लास्टिकच्या वस्तू फेकतात. त्यातून पर्यावरणाची हानी होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याकडील प्लास्टिकच्या वस्तू उपक्रमातील स्टॉल्सला द्यावेत. 
- सुरेखा तातेड

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Festival 2017 Pune Ganesh Utsav