नियोजनबद्ध बंदोबस्ताने शांतता

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

२८ तास पाच मिनिटे जल्लोष वेळ; गेल्या वर्षीपेक्षा २५ मिनिटे कमी

पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी केलेली पूर्वतयारी, नियोजन आणि अहोरात्र चोख बंदोबस्त यामुळे यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. 

पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहर परिसरात यंदा चार हजार ४८४ सार्वजनिक गणेश मंडळे आणि चार लाख ८७ हजार १९ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. बुधवारी (ता. ६) दुपारी २.२० वाजता नटेश्‍वर घाटावर भवानी पेठेतील गोकूळ वस्ताद तालीम तरुण मंडळ ट्रस्ट या शेवटच्या गणपतीचे विसर्जन झाले.  

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंदोबस्तासाठी ८४७ पोलिस अधिकारी आणि सात हजार ८७० पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला आणि सहआयुक्‍त रवींद्र कदम यांच्या सूचनेनुसार नियोजनबद्ध बंदोबस्त राखण्यात आला होता. 

मुख्य मिरवणूक विसर्जनासाठी प्रमुख रस्त्यांवर सहभागी झालेली मंडळे 
(एकूण ६१२) 

बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने जाणारी मंडळे - २४१
(मानाचे व मंडईकडून - ८, शिवाजी रस्त्याने - ४३ आणि बेलबाग 
चौकामागून १९०)
टिळक रस्ता  १९७
कुमठेकर रस्ता ४७
केळकर रस्ता १२७

मिरवणूक सुरवात वेळ (ता. ५), 
टिळक चौकात शेवटचा गणपती 
आलेली वेळ (ता. ६)

लक्ष्मी रस्ता - सकाळी १०.३०               ११.३६
कुमठेकर रस्ता - सायंकाळी ६.१०                ११.३२ 
केळकर रस्ता -  सकाळी ११.३०                 ११.४२
टिळक रस्ता -  सायंकाळी ५.३०                  १२.५५ 

शहराच्या इतर भागांतील गणपती विसर्जन :
परिसर     मिरवणूक सुरू वेळ (ता. ५)   विसर्जन वेळ  (ता. ६) 

लष्कर      सायंकाळी ६.३०               रात्री १२.३० 
खडकी      दुपारी ३.३०                    पहाटे १.२० 
कोथरूड     सकाळी १०                     पहाटे ४ 
दत्तवाडी      सकाळी ११                    पहाटे १
पिंपरी          सायंकाळी ४                   पहाटे २   
चिंचवड       सायंकाळी ५.३०                 पहाटे २ 
भोसरी         सायंकाळी ५.३०                पहाटे २ 
हडपसर      सकाळी ११                       पहाटे २ 
कोंढवा       सायंकाळी ४                     पहाटे २ 

सार्वजनिक गणेश मंडळांचे विसर्जन 
(दिवस आणि संख्या)

२६ ऑगस्ट - दीड दिवस - १
२७ ऑगस्ट - तिसरा दिवस - ६
२९ ऑगस्ट - पाचवा दिवस - ८८
३० ऑगस्ट - सहावा दिवस - ३३
३१ ऑगस्ट - सातवा दिवस (गौरी विसर्जन) - ४७९
१ सप्टेंबर - आठवा दिवस - ५५
२ सप्टेंबर - नववा दिवस - २७८
३ सप्टेंबर - दहावा दिवस -  ४७७
५ सप्टेंबर - (अनंत चतुर्दशी) - ३०६४

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh visarjan miravnuk