मध्यवर्ती शहरातील रस्त्यांवर "नो एंट्री'

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 September 2017

पोलिसांची माहिती; उद्यापासून गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी
पुणे - अनंत चतुर्दशी रोजी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ पासून बुधवारी (ता. 6) मिरवणूक संपेपर्यंत मध्यवर्ती शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

या रस्त्यावर "ना वाहतूक, ना पार्किंग'

पोलिसांची माहिती; उद्यापासून गणपती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंदी
पुणे - अनंत चतुर्दशी रोजी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे मंगळवारी (ता. 5) सकाळी नऊ पासून बुधवारी (ता. 6) मिरवणूक संपेपर्यंत मध्यवर्ती शहरांतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

या रस्त्यावर "ना वाहतूक, ना पार्किंग'
- शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ पुतळा ते जंक्‍शन चौक
- लक्ष्मी रस्ता - संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक
- बाजीराव रस्ता - बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
- कुमठेकर रस्ता - टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
- केळकर रस्ता - बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
- बगाडे रस्ता - सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक
- गणेश रस्ता - दारूवाला पूल ते जिजामाता चौक
- गुरू नानक रस्ता - देवाजी बाबा चौक- हमजे खान चौक ते गोविंद हलवाई चौक
- टिळक रस्ता - जेधे चौक ते टिळक चौक
- शास्त्री रस्ता - सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक
- जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
- कर्वे रस्ता - नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक
- फर्ग्युसन रस्ता - खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य प्रवेशद्वार
- भांडारकर रस्ता - पीवायसी जिमखाना, गुडलक चौक ते नटराज चौक
- पुणे सातारा रस्ता - व्होल्गा चौक ते जेधे चौक
- सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
- प्रभात रस्ता - डेक्कन पोलिस ठाणे ते शेलारमामा चौक

पर्यायी वाहतूक वळविण्याचे (डायव्हर्शन) चौक खालीलप्रमाणे -
- जंगली महाराज रस्ता - झाशी राणी चौक
- शिवाजी रस्ता - काकासाहेब गाडगीळ रस्ता
- मुदलियार रस्ता - अपोलो टॉकीज
- नेहरू रस्ता - संत कबीर पोलिस चौकी
- सोलापूर रस्ता - सेव्हन लव्हज चौक
- सातारा रस्ता - व्होल्गा चौक
- बाजीराव रस्ता - सावरकर पुतळा चौक
- लाल बहादूर शास्त्री रस्ता - सेनादत्त पोलिस चौकी
- कर्वे रस्ता - नळस्टॉप
- फर्ग्युसन कॉलेज रस्ता - गुडलक चौक

रिंगरोड वाहतूक खालीलप्रमाणे (या रिंगरोड मार्गांवरून दुहेरी वाहतूक सुरू राहील.)
कर्वे रस्ता-नळस्टॉप चौक-लॉ कॉलेज रस्ता-सेनापती बापट रस्ता-सेनापती बापट रस्ता जंक्‍शन-गणेशखिंड रस्ता-सिमला ऑफिस चौक-संचेती हॉस्पिटल चौक-इंजिनिअरिंग कॉलेज चौक-आंबेडकर रस्ता-शाहीर अमर शेख चौक-मालधक्का चौक-बोल्हाई चौक-नरपतगिरी चौक-नेहरू रस्ता-संत कबीर पोलिस चौकी-सेव्हन लव्हज चौक-वखार महामंडळ चौक-शिवनेरी रस्त्यावरून-गुलटेकडी मार्केटयार्ड-मार्केटयार्ड जंक्‍शन-सातारा रस्त्याने व्होल्गा चौक-सिंहगड रस्त्याने-मित्रमंडळ चौक-सावरकर चौक-सिंहगड रस्ता जंक्‍शन-लाल बहादूर शास्त्री रस्त्याने-सेनादत्त पोलिस चौकी-अनंत कान्हेरे रस्त्यावरून म्हात्रे पूल ते नळस्टॉप.

येथे करता येणार पार्किंग
- एच. व्ही. देसाई कॉलेज, शनिवार पेठ
- पुलाची वाडी, नदी किनारा
- पूरम चौक ते हॉटेल विश्‍व
- दारूवाला पूल ते खडीचे मैदान
- गाडगीळ पुतळा ते कुंभारवेस
- कॉंग्रेस भवन ते मनपा रस्ता
- जयवंतराव टिळक पूल ते भिडे पूल दरम्यान नदीपात्रातील रस्ता
- हमालवाडा पार्किंग नारायण पेठ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ganesh festival 2017 pune ganesh visarjan rally