एकेरी पादचारी मार्गांचे नियोजन पडले अपुरे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले एकेरी पादचारी मार्गांचे नियोजन विसर्जन मिरवणुकीत अपुरे पडले. त्यामुळे नागरिकांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. हाकेच्या अंतरावर असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. 

पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेले एकेरी पादचारी मार्गांचे नियोजन विसर्जन मिरवणुकीत अपुरे पडले. त्यामुळे नागरिकांना चेंगराचेंगरीला सामोरे जावे लागले. हाकेच्या अंतरावर असलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. 

लक्ष्मी रस्त्यावर एकेरी पादचारी मार्गांचे नियोजन पोलिसांनी केले होते. या रस्त्यावर गणपती चौक ते बेलबाग चौकादरम्यान त्याची काटेकोर अंमलबजावणी होते. त्यानुसार लक्ष्मी रस्त्यावरून डाव्या बाजूने बेलबाग चौकाकडे जाण्यासाठी तर उजवीकडून गणपती चौकाकडे येण्यासाठी पादचारी मार्ग केले होते. परंतु, दोन्ही बाजूने गर्दीचे प्रचंड लोंढे बेलबाग चौकाकडे मध्यरात्रीपासून येण्यास सुरवात झाली. त्याचवेळी बेलबाग चौकाकडून गणपती चौकाकडे जाणाऱ्या नागरिकांचीही गर्दी त्याच पदपथांवरून जाऊ लागली. गर्दीचे दोन्हीकडून लोंढे समोरासमोर आल्यामुळे चेंगराचेंगरी होऊ लागली. त्यावेळी बंदोबस्ताला चार पोलिस आणि काही पोलिस मित्र होते. गर्दीपुढे त्यांची संख्या अपुरी पडत होती. चेंगराचेंगरीचा फटका महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनाही बसला. एकेरी पादचारी सुरू होतात, त्या ठिकाणी पोलिस नसल्यामुळे नागरिक दोन्ही बाजूने बेलबाग चौकाकडे जात होते. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत हा प्रकार सुरू होता. पुणे नगर वाचन मंदिरापासून काही अंतरावरच वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. परंतु, चेंगराचेंगरीबद्दल ते अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news Single pedestrian route planning flop