‘तुळशीबाग’ मंडळाकडून विद्यार्थ्यांना मदत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 September 2017

पुणे - विद्येची देवता श्रीगणेशाला साक्षी ठेवत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संकल्प सोडला आणि विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक खर्चाचा विडा उचलला. रात्र प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘श्रीं’ची आरती करून त्यांना शिष्यवृत्ती देखील बहाल केली. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाने तुळशीबाग पतसंस्था आणि स्टेशनरी, कटलरी ॲण्ड जनरल मर्चंट असोसिएशनच्या वतीने रात्र प्रशालेच्या प्राचार्यांकडे मदतीचा पंचवीस हजार रुपयांचा धनादेशही सुपूर्द केला. 

‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या बैठकीत या मंडळाकडून रात्र प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा विचार व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंडळाने विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. सरस्वती विद्या मंदिर संस्थेच्या रात्र प्रशालेचे प्राचार्य अविनाश ताकवले आणि आबासाहेब अत्रे रात्र प्रशालेचे प्राचार्य विजय सूर्यवंशी यांनी हे धनादेश स्वीकारले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, कोशाध्यक्ष नितीन पंडित, स्टेशनरी, कटलरी ॲण्ड जनरल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह रजपूत, सरस्वती विद्या मंदिर संस्थेचे चिटणीस सुधीर चौधरी, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक सुनील माळी उपस्थित होते.

‘सकाळ’ कार्यालयात झालेल्या बैठकीनुसार काही मंडळांनी रात्र प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांना मदत देण्याचा मानस व्यक्त केला, ही निश्‍चितच स्तुत्य बाब आहे. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आणि मानाचा चौथा गणपती मंडळातर्फे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. ती त्यांना उपयुक्त ठरेल.
- अविनाश ताकवले, प्राचार्य, सरस्वती विद्या मंदिर रात्र प्रशाला

सामाजिक बांधिलकीतून मंडळांनी रात्र प्रशालेला आर्थिक मदत देणे, हा स्तुत्य उपक्रम आहे. समाजाचेही आपण काही देणे लागतोय, याच भावनेतून केलेली ही मदत कौतुकास्पद आहे,
- विजय सूर्यवंशी, प्राचार्य, आबासाहेब अत्रे रात्र प्रशाला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news student help by tulshibag mandal