#MarathaKrantiMorcha चाकणला जनजीवन सुरळीत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 August 2018

चाकण - येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या हिंसाचारानंतर दुसऱ्याच दिवशी जनजीवन सुरळीत झाले. आज (ता. १) सगळे रस्ते गर्दीने भरून गेले होते. तसेच पथारीवाले, हातगाडीवाले रस्त्यावर बसून होते. व्यावसायिकांनी शंभर टक्के दुकाने उघडली होती. शहरात व परिसरातील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली होती. शहरात मात्र पोलिसांचा वाहनांसह बंदोबस्त होता.

काल गृहराज्यमंत्री दीपक केसरकर हे चाकणला आले होते. त्यांनी रस्त्यावरची वर्दळ पाहिल्यानंतर मुंबईला बॉम्बस्फोट आदी घटना घडल्यानंतर मुंबई जशी पूर्ववत होते, तसे चाकण तत्काळ पूर्ववत झाले, असे सांगितले होते. चाकण येथे कालपासून दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले आहेत. हिंसाचारात सरकारी व काही पोलिसांची वाहने समाजकंटकांनी जाळली होती. सर्वसामान्यांच्या दुकानाला, तसेच वाहनांना हात लावला नव्हता. शहरात तोडफोड करण्यात आली नव्हती. फक्त पोलिस ठाण्यात तोडफोड केली गेल्याने, तसेच पोलिसांची वाहने पोलिस ठाण्यासमोर जाळल्याने सर्वसामान्य माणसात भीती होती. पोलिसांनाच समाजकंटक मारतात, तर सर्वसामान्यांचे काय? 

अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य माणसातून उमटत होत्या. महामंडळाने एसटी बस सेवा बंद ठेवल्याने एसटी बस चाकण बसस्थानकात येत नसल्या, तरी चाकण बसस्थानकात इतर दुकाने, हॉस्पिटल्स असल्याने नागरिकांची तसेच इतर लोकांची मोठी वर्दळ होती. कंपन्या सुरू असल्याने कामगारवर्ग कंपन्यात कामासाठी गेला होता. कंपन्यांच्या बससेवा ही पूर्ववत सुरू होत्या. शहरातील शाळा, महाविद्यालये सुरू झाली होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan roads were filled with densely