#MarathaKrantiMorcha चाकणला तणावपूर्ण शांतता

#MarathaKrantiMorcha चाकणला तणावपूर्ण शांतता

चाकण - येथे सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी हिंसाचार झाला. या घटनेनंतर शहरात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. पोलिसांच्या वाहनांची शहरातून काही मिनिटाला ये- जा चालू आहे. सायरनचे आवाज घोंघावत वाहने जात आहेत. त्यामुळे शहराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. जनजीवन सुरळीत आहे. पण, वीस टक्के दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने उघडली नाहीत. इतर दुकाने व कार्यालये आज सुरळीत सुरू होती. सोमवारच्या तणावपूर्ण परिस्थितीने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, हायस्कूल व खासगी शाळांनी सुट्या दिल्या होत्या. तसे, संदेश भ्रमणध्वनीवरून फिरविण्यात आले होते. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याची धास्ती घेतली होती, असे चित्र होते.

शहर व परिसरातील कायदा, सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी चारशे पोलिसांचा बंदोबस्त व पन्नासवर पोलिसांची वाहने आहेत. 

शहरात एक क्‍यूआरटी पथक, दोन एसआरपी पथक, तीनशे जिल्हा पोलिस आदी सुमारे चारशे पोलिसांचा बंदोबस्त आहे. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील हे चाकण पोलिस ठाण्यात तळ मांडून आहेत. पोलिस ठाण्यातदेखील पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. पोलिसांचे वाहनांतून शहर व परिसरात पेट्रोलिंग सुरू आहे. औद्योगिक वसाहतीत काही प्रकार होऊ नये, यासाठी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. 

जाळपोळीची दाहकता शमली असून, आजची सकाळ चाकणकर नागरिकांची नित्यनियमाने झाली. आजपर्यंतची सर्वांत मोठी हिंसक घटना घडली असली, तरी त्यावर मात करीत चाकण ग्रामस्थ आणि या भागात आलेल्या चाकरमान्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता दैनंदिन व्यवहार सुरू ठेवले. तरीदेखील या उद्योगनगरीत रोजगारासाठी आलेल्या परजिल्ह्यातील आणि परप्रांतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर भीतीचे वातावरण मात्र स्पष्टपणे जाणवत होते. 

चाकण शहर काल सायंकाळपर्यंत धुमसत होते. परंतु, संध्याकाळी पुरेसा पोलिस बंदोबस्त आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. त्यामुळे आज सकाळपासून चाकण शहरासह परिसरातील वाड्यावस्त्यांवरील स्थिती पूर्णपणे निवळली असून, दैनंदिन व्यवहार सुस्थितीत सुरू झाले. कामगार वर्गानेदेखील कसल्याही दबावाला बळी न पडता कामावर हजेरी लावली. बस आणि एसटी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे चित्र होते. चाकण शहरात जरी पोलिस दल तैनात असले तरीदेखील व्यावसायिकांच्या मनात एकप्रकारे भीती असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. 

लवकरच बैठक
शहर व परिसरातील कायदा, सुव्यवस्था राखण्यासाठी गावातील व शहरातील नेत्यांची आणि विविध गावचे सरपंच, पोलिस पाटील यांची बैठक लवकर आयोजित करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक पाटील यांनी दिली.

चाकणला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप
चाकण - हिंसाचाराच्या घटनेनंतर शहरात व परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला आहे. रस्त्यावर पोलिसांची वाहने लावण्यात आली आहे. पोलिसांच्या वाहनांची शहरातून काही मिनिटाला ये- जा चालू आहे. सायरनचे आवाज घोंघावत वाहने जात आहेत. त्यामुळे शहराला पोलिसांच्या छावणीचे स्वरूप आले आहे. जनजीवन सुरळीत आहे. पण, वीस टक्के दुकानदारांनी भीतीपोटी दुकाने उघडली नाहीत. इतर दुकाने व कार्यालये आज सुरळीत सुरू होती. सोमवारच्या तणावपूर्ण परिस्थितीने जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा, हायस्कूल व खासगी शाळांनी सुट्या दिल्या होत्या. तसे, संदेश भ्रमणध्वनीवरून फिरविण्यात आले होते. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्याची धास्ती घेतली होती, असे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com