#MarathaKrantiMorcha चाकणला प्रत्येक चौकात अनुभवली दहशत

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 31 July 2018

पिंपरी - चाकण बंदला हिंसक वळण लागल्याने वार्तांकन करण्यासाठी जात असताना प्रत्येक चौकात दहशत अनुभवावयास मिळाली. हातात दगड आणि दांडकी घेतलेले तरुण रस्त्यावर मोठमोठे दगड टाकत टायर जाळत होते. यामुळे सर्वत्र दहशत अनुभवायला मिळाली.

पिंपरी - चाकण बंदला हिंसक वळण लागल्याने वार्तांकन करण्यासाठी जात असताना प्रत्येक चौकात दहशत अनुभवावयास मिळाली. हातात दगड आणि दांडकी घेतलेले तरुण रस्त्यावर मोठमोठे दगड टाकत टायर जाळत होते. यामुळे सर्वत्र दहशत अनुभवायला मिळाली.

तळवडे सोडल्यानंतर चाकण एमआयडीसीमध्ये महेंद्र कंपनीपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथील कंपनीतून सुटलेला कामगार बसची वाट पाहत होता. तर, काहींनी थेट चालत महामार्ग गाठला. ठिकठिकाणच्या चौकात हातात फुटलेली वाहने, हातात दगड आणि दांडके घेतलेले तरुण उभे होते. वाहतूक रोखण्यासाठी टायरही जाळण्यात आले होते. हौशींनी हातातील मोबाईलवरून याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांकडून त्यांचे मोबाईलही फोडण्यात आले.

चाकणजवळील नाणेकरवाडी परिसरात जमाव रस्त्याने मिळेल ती वाहने फोडत होता. आसपासच्या भागातील रहिवासी आपल्या घरातून हा प्रकार पाहत होते. जमावाने त्यांनाही खाली येण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या घरावरही दगडफेक केली. त्यानंतर चार वाहनांना जमावाने आग लावली. त्यापैकी शेवटच्या ट्रकमध्ये रसायन भरलेले होते. ट्रकचे केबिन जळून खाक झाले होते. आग मागील भागत पसरण्यास सुरवात झाली. मात्र, पिंपरी-चिंचवड अग्निशामक दलाच्या जवानांनी हा धोका ओळखून अग्निशामक अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांनी आपल्या सहकार्याच्या साथीने जीव धोक्‍यात घालून ट्रकमधील रसायन बाहेर काढले. या रसायनाचा स्फोट झाला असता, तर मोठा अनर्थ घडला असता. जमावाकडून नाणेकरवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू असताना एकही पोलिस त्याठिकाणी फिरकला नाही. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही जमावाकडून धक्‍काबुक्‍की करण्यात आली. फोटो काढले, तर कॅमेऱ्यासह तुम्हाला फोडू, अशी धमकी पत्रकारांना देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chakan terror experienced every chowk