Maratha Kranti Morcha: मराठा आंदोलनामुळे अाज शाळा, महाविद्यालये बंद

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 August 2018

पिंपरी - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) पिंपरी- चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

पिंपरीमध्ये मराठा मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर पाटील, सतीश काळे, नाना फुगे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

पिंपरी - मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने गुरुवारी (ता. ९) पिंपरी- चिंचवड बंदची हाक देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

पिंपरीमध्ये मराठा मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. त्या वेळी प्रकाश जाधव, मारुती भापकर, धनाजी येळकर पाटील, सतीश काळे, नाना फुगे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, कोपर्डी घटनेतील आरोपींना शिक्षा द्यावी, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी पिंपरी- चिंचवड बंदचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत बोलताना जाधव म्हणाले, ‘‘पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी आपले व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहकार्य करावे. रुग्णालय, मेडिकल व इतर आपत्कालीन सेवा वगळून हा बंद आयोजित केला आहे. गुरुवारी बंदच्या दिवशी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच, हा बंद शांततेच्या मार्गाने करावा, असे आवाहनही त्यांनी समाजाला केले आहे.

राज्यात ठिकठिकाणी बंदला हिंसक वळण लागल्याने अनेक कंपन्यांनी कामगारांना सुटी दिली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी- चिंचवड शहरात गुरुवारी औद्योगिक सुटी असल्याने एमआयडीसीतील कंपन्या बंद राहणार आहेत.

क्रांती रिक्षा संघटनेचाही पाठिंबा
पिंपरी- चिंचवड शहरातील क्रांती रिक्षा संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षा चालक आणि मालकांनी आपापल्या रिक्षा बंद ठेवाव्यात, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीधर काळे यांनी केले आहे.
चाकण येथील बंदला हिंसक वळण लागून २५ हून अधिक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तसेच, चिंचवड येथे श्रद्धांजली सभा सुरू असताना वाल्हेकरवाडी परिसरात टोळक्‍याने बंदचे आवाहन करीत अनेक दुकानांवर दगडफेक केली होती. तशातच सोशल मीडियावर बंदबाबत उलट सुलट पोस्ट येत असल्याने नागरिकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शांततेत पाळण्याचे आवाहन
सोमाटणे - आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार (ता. ९) ‘राज्यव्यापी बंद’ची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या काळात तरुणांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, बंद शांततेत पाळावा, छत्रपतींचा आदर्श पुढे न्यावा, असे आवाहन बारामतीकर तरुणांनी केले. बारामती येथील प्रशांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पन्नास तरुणांच्या पथकाने मावळात शांतता जनजागृती मोहीम राबविली. राजेश मुऱ्हे, नवनाथ मुऱ्हे, हनुमंतराव मुऱ्हे, शैलेश मुऱ्हे, आत्माराम मुऱ्हे, अनंता आंद्रे, विष्णू मुऱ्हे यांच्या उपस्थितीत शांतता रॅली काढण्यात आली.

बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. शहरातील बहुतांश परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यासाठी अधिक कुमक मागविण्यात आली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलक व सर्वसामान्य नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- मंगेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त-परिमंडळ तीन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation School College Close