Maratha Kranti Morcha: बारा किलोमीटरसाठी दोन हजार रुपये

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 August 2018

वडगाव शेरी - बंदमुळे लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांचे हाल झाले. विमानतळावरून पुण्यात जाण्यासाठी टॅक्‍सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची अडवणूक करून पैसे उकळत असल्याचे दिसून आले. विमानतळावरून कॅंप किंवा स्टेशन परिसरात जाण्यासाठी टॅक्‍सीचालक दोन हजार रुपये, तर रिक्षाचालक आठशे रुपये मागत होते. 

भुवनेश्वर वरून पुण्यात आलेले वैद्यकीय महाविद्यालयाचे सुमारे पन्नास विद्यार्थी टॅक्‍सीचालक जास्त पैसे मागत असल्याने विमानतळावर अडकून पडले होते. तसेच शिर्डीला जाणारे भाविकही टॅक्‍सी भाड्याने मिळत नसल्याने किंवा टॅक्‍सीचालक जास्त पैसे मागत असल्याने अडकून पडले होते. बंदमुळे ओला आणि उबेर कॅबची सेवा बंद होती. त्यामुळे विमानतळावरील प्रीपेड टॅक्‍सी व रिक्षाचालकांचे फावले.

खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे दिलासा
विमानतळावरील खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू राहिल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. तेथे बंदची माहिती समजल्यावर पाच ते सहा तास अडकून पडलेल्या प्रवाशांची खाण्यापिण्याची सोय झाली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha reservation Lohgaon airport passenger 2000 rupees loot taxi driver