मराठा संवाद यात्रा : पुण्यातही समन्वयकांना केले स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 November 2018

पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

 शहरातील विविध भागातुन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलिसांकडुन अचानक स्थानबद्ध केले जाऊ शकते, याचा अंदाज आल्याने अनेकजण रविवारीच मुंबईला दाखल झाले. मराठा क्रांती मोर्चाचा झेंडा गाडीवर लावणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, काहीनी खासगी वाहने न वापरता बस, रेल्वेने प्रवास करुन मुंबई गाठली.

पोलिसांकडुन रात्री-अपरात्री स्थानबद्ध करण्याच्या या प्रकाराबाबत समन्वयकांनी तीव्र स्वरुपात संताप व्यक्त केला. दरम्यान रावेत येथून "मराठा संवाद यात्रा" सुरु होणार होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा ठेवून अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Samvad Yatara coordinators arrests from Pune