#MarathaKrantiMorcha चाकणमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 July 2018

चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, बसवर दगडफेक करण्यात आली आहे. जवळपास शंभर गाड्या फोडल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, अग्निशामक दलाचा बंबही पेटवण्यात आला आहे.

चाकण(पुणे)- चाकण येथे मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, बसवर दगडफेक करण्यात आली आहे. जवळपास शंभर बस फोडल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच, अग्निशामक दलाचा गाडीही पेटवण्यात आली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे. या दरम्यान, आंदोलकांनी पोलिसांच्या दोन गाडयाही जाळल्या आहेत. त्याचबरोबर, चाकणचे बस स्थानकही फोडण्यात आले आहे. 

त्याचबरोबर, राजगुरूनगर येथे आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे. त्यामुळे, पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे. राजगुरूनगरला शांततेत मोर्चा काढण्यात आला. यावेळी बाजारपेठ बंद करण्यात आली.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यानी मराठा आंदोलकांना शांत राहण्याचे आवाहन केले होते. चर्चेतून आणि शांततेतून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करा असे त्यांनी म्हटले होते. परंतु, मराठा आंदोलक मात्र मागे हटायला तयार नाहीत. राज्यभरात अशा प्रकारच्या हिंसक घटना या वाढतच आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MarathaKrantiMorcha Violent turn of Maratha movement in Chakan