लक्षवेधी पर्यावरणपूरक मूर्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

हडपसर - नवरात्रोत्सवानिमित्त पुणे बॅंगो सन्मलिनी पुरबो पूना कालीबारी समितीच्या वतीने भोसले गार्डन येथे पर्यावरणपूरक दुर्गामातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. माती, नैसर्गिक रंग, बांबू आणि भाताच्या पेंढ्यापासून तयार केलेली १३ फूट उंच व १८ फूट लांब मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. महिशासुराचा वध करताना दुर्गामाता, लक्ष्मी, सरस्वती, कार्तिक व गणेश अशी आरास असलेल्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. हडपसर परिसरातील दीडशेहून अधिक बंगाली कुटुंबे या उत्साहात सहभागी झाली आहेत.

या उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि दररोज महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तसेच अनाथालय व दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात येत आहे. समितीच्या वतीने वर्षभरात रक्तदान आणि पंढरपूरच्या दर्शनासाठी निघालेली वारी पुण्यात आल्यानंतर वारकऱ्यांना निवास व अन्नदान करण्यात येते, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर विश्वास, अभिजित डे, प्रबीर शील, सौरभ वसाक, सौयाशीलस घोसाल, चंदना घोष, बीना तिवारी, सुनीता घोष यांनी दिली.

शील म्हणाले, ‘‘बंगालमध्ये दुर्गापूजेची परंपरा खूप जुनी आहे. राम-रावण यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वी रामाने दुर्गादेवीची पूजा केली होती, अशी कथा आहे. त्यामुळे दसऱ्याआधी दुर्गापूजा करण्याची प्रथा सुरू झाली. भोसले गार्डन येथे गेल्या १५ वर्षांपासून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत. पुण्यात बंगाली लोकांची संख्या वाढल्याने आता शहरात विविध ठिकाणी दुर्गापूजा होते.’’

उत्सवादरम्यान देश-विदेशातील बंगाली नागरिक आपली सर्व कामे बाजूला ठेवून समितीच्या दुर्गा उत्सवात सहभागी होतात, असेही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hadapsar pune news Eco-friendly idol