#SaathChal शहा, मुख्यमंत्र्यांनी घेतले पालखीचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 July 2018

पुणे : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहे. वारीच्या निमित्ताने दोन्ही ठिकाणच्या पालखीच्या दर्शनासाठी आज दुपारी दोघांनी हजेरी लावली. यावेळी पोलिस व गाड्यांचा मोठा ताफा यांच्यासह दोघंही पालखीच्या दर्शनाला आले. सर्वांत प्रथम त्यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले व नंतर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. दोन्ही पालखी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

भाविकांना दोन्हीकडे पंधरा ते वीस मिनिटे पालखीचे दर्शन घेण्यासाठी थांबावे लागले. पोलिसांनी पालखी परिसरात येण्यास भाविकांना व पत्रकारांना येण्यास मनाई करत होते. भाविक तासनतास रांगेत आधीच रांगेत लागून दर्शन घेत असताना व्हीआयपी लोकांसाठी वेगळी सुविधा का? यानिमित्ताने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amit Shaha and Chief Minister visited Palkhi in pune