#SaathChal रसिकांना भावला ‘भजनरंग' 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 July 2018

पुणे : आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री संत दर्शन मंडळ आणि सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ‘भजनरंग’ या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन गणेश कला क्रिडामंच स्वारगेट येथे नुकतेच करण्यात आले होते. या वेळी प्रसिद्ध गायक पंडित सुरेश वाडकर, कार्तिकी गायकवाड, योगिता गोडबोले, आणि राजेश दातार गायन बहारदार गायन करून रसिकांची मने जिंकली.

या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या रचनेचे गायिका योगीता गोडबोले यांनी केली. याच बरोबर गोडबोले यांनी 'रुणुझूणु रे भ्रमरा', 'रंगा येई वो' या रचना सादर केल्या. गायिका कार्तिकी गायकवाड यांनी 'विष्णूमय जग', 'सौभाग्य दा', 'घागर घेवू', 'भावाचा भुकेला पांडुरंग' अशा रचना सादर करून रसिकांची मने जिंकली. पंडित सुरेश वाडकर यांनी 'काळ देहासी', 'अवघे झाले पांडुरंग', 'पंढरीचा निळा', 'विठ्ठल आवडी' या बहारदार रचना सादर केल्या. वाडकरांच्या गायनाला रसिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.  

गायक राजेश दातार यांनी 'राधे तुला', 'राजा पंढरीचा', 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल' या रचना सादर केल्या.  दातार यांनी सादर केलेल्या रचनांना रसिकांनी वन्स मोअरची दाद दिली. या कार्यक्रमाचे वादक कलाकार प्रशांत पांडव, नितीन तिकोणकर, आनंद टाकळकर, मिलिंद गुणे, दर्शना जोग, प्रमोद जांभेकर यांनी साथ संगत दिली. तर प्रसिद्ध निरुपणकार डॉ. संजय उपाध्ये यांनी या कार्यक्रमाचे निरूपण केले. या कार्यक्रमासाठी रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्वोत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा राजेश दातार यांनी अशी माहिती दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bhajan for vitthal bhakt