#saathchal ‘साथ चल’ उपक्रम समाजासाठी गरजेचा - हर्षित अभिराज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

पुणे  - ‘साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल’... ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. ‘माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला’ हे ‘सकाळ’चे आवाहन समाजासाठी खूपच गरजेचे आहे, अशा भावना अभिराज यांनी व्यक्त केल्या.

‘सकाळ’चे उपसंपादक पितांबर लोहार यांनी लिहिलेल्या या भावस्पर्शी गीताला साजेशी अशी चाल अभिराज यांनी दिली असून, ते गीत उत्कटतेने गायले आहे. या गीताला उदय गाडगीळ, संदीप चव्हाण, वर्षा जांभेकर, सृष्टी सोंडकर, अर्पित कोमल, सचिनकुमार लोहरा यांनी कोरस दिला आहे. त्याचे म्युझिक प्रोग्रॅमिंग सचिन अवघडे यांचे, तालवाद्य संयोजन पद्माकर गुजर यांचे असून, मेलडी मेकर्सचे अभिजित सराफ ध्वनिमुद्रक आहेत. साम वाहिनीवरही हे गीत वारीच्या दृश्‍यांसह पाहता येणार आहे.

Web Title: #saathchal Activities need for society says Harsshit Abhiraj