#saathchal वैष्णवांचा मेळा उद्योगनगरीत दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 July 2018

निगडी - 
माउली वरदहस्त लाभो 
तुझा सर्वांसी ।
सुखी ठेवा सदैव
आम्हा लेकरांसी....।।

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वैष्णवांचा आनंदमेळा चैतन्यमयी वातावरणात शुक्रवारी (ता. ६) उद्योगनगरीत सायंकाळी पावणेपाच वाजता प्रवेश करता झाला. आबालवृद्ध वारकरी, खांद्यावर भगवी पताका, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष, लाडक्‍या विठ्ठलाला अभंगातून दिलेली हाक, लयीत वाजणारे टाळ आणि विठुनामाचा गजर, असे भारलेले वातावरण निगडीतील भक्ती-शक्ती या शहराच्या प्रवेशद्वारावर होते. या वेळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भक्ती-शक्ती चौक अक्षरशः भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

शेंगदाणे वाटप
वारकऱ्यांना संस्कृती संवर्धन व विकास महासंघातर्फे शेंगदाण्याचे वाटप करण्यात आले. चिंचवड स्टेशन व दापोडी येथे या संस्थेतर्फे शनिवारी शेंगदाणेवाटप करणार आहे. रविकांत कळंबकर, अच्युत होनप, किसन महाराज चौधरी डॉ. अजित जगताप, विकास देशपांडे, शिरीष देशपांडे, प्रकाश टाकळकर, सागर दाणी, हेमंत थोरात, माधुरी ओक, ललिता जोशी, भास्कर रिकामे, प्रदीप पाटील, नीता जाधव, दीपक नलावडे, दीपक पंडित यांनी यासाठी परिश्रम घेतले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #saathchal Sant Dnyaneshwar maharaj palkhi