esakal | #SaathChal जेजुरीत ग्रीन वारी उपक्रमातून जागृती
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरी (ता. पुरंदर) - साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने आयोजित ग्रीन वारी उपक्रमात सहभागी मान्यवर व वारकरी.

#SaathChal जेजुरीत ग्रीन वारी उपक्रमातून जागृती

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जेजुरी - ‘झाडे लावा झाडे जगवा’ संदेश देण्यासाठी व जागृती करण्यासाठी साम टीव्ही व सह्याद्री देवराई सामाजिक संस्था यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात ‘ग्रीन वारी’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जेजुरीत पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयात वृक्षारोपण करून व वारकऱ्यांना बीजगोळ्यांचे वाटप करून जागृती करण्यात आली.

माउलींची पालखी बुधवारी (ता. ११) जेजुरीत मुक्कामी होती. सकाळपासूनच जेजुरी वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली होती. पुण्यश्‍लोक अहल्यादेवी विद्यालयातील मैदानावर या ग्रीन वारीचा उपक्रम राबविण्यात आला.

वारकरी, शिक्षक व विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांना बीजगोळे वाटप करण्यात आले. तर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी प्राचार्य सुनील निंबाळकर, जनता शिक्षण संस्थेचे सहसचिव पोपटराव ताकवले, डी. बी. वाबळे, पर्यवेक्षक डी. बी. जगताप, खंडोबा भराडे, बी. एम. दहिफळे, धनंजय नेवसे, दरेकर, शिक्षिका जयश्री दरेकर, शीतल गायकवाड, रंजना लाखे उपस्थित होते. साम टीव्हीचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे, किरण काजळे, अशोक दांडेकर, ‘सकाळ’चे बातमीदार तानाजी झगडे आदी उपस्थित होते. प्राचार्य सुनील निंबाळकर यांनी ग्रीन वारी उपक्रमाचे कौतुक केले. परिसरात जांभूळ, करंज, आवळा आदी प्रकारची झाडे लावण्यात आली. पोपटराव ताकवले व डी. बी. जगताप यांनी वृक्षारोपणाचे नियोजन केले. सासवड, जेजुरी, वाल्हेपर्यंत साम टीव्हीचे पुणे विभागाचे प्रतिनिधी नियोजन पाहणार आहेत.   

वनविभागाकडूनही जागृती
सरकारच्या तेरा कोटी वृक्षलागवड योजनेची जनजागृती करावी या उद्देशाने जेजुरी वनविभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मदतीने दोन किलोमीटर अंतरापर्यंत हातात फलक घेऊन फेरी काढण्यात आली. या वेळी वनपाल वाय. जे. पाचारणे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, गजानन बयास, बाळासाहेब चव्हाण, महादेव माने, श्रीकांत गायकवाड व विद्यार्थी सहभागी झाले होते.