#SaathChal 'साथ चल'च्या पुढच्या टप्प्यास आज पुलगेटपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 July 2018

पुणे - आई-वडील आणि कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसोबत दोन पावले चालण्याच्या "साथ चल' उपक्रमाच्या पुढच्या टप्प्याला शहरात रविवारी (ता. 9) सुरवात होत आहे. "सकाळ माध्यम समूह' आणि "फिनोलेक्‍स केबल्स' कंपनीतर्फे त्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पुणेकर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

"साथ चल' उपक्रमात महापौर मुक्ता टिळक यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी होतील. विद्यार्थी, महिला संघटना, तसेच व्यापारी, डॉक्‍टर, वकील, रिक्षा संघटना, तसेच विविध धर्मीय आणि समाज घटक, रोटरी क्‍लब, लायन्स क्‍लबच्या प्रतिनिधींचाही त्यात समावेश असेल. राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) 100 जवानांनाही त्यात सहभागी करून घेण्यात येणार आहे. चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातील अभिनेते, अभिनेत्रीही त्या प्रसंगी उपस्थित राहतील. कॅंप भागातील पुलगेट येथील पीएमपीच्या महात्मा गांधी बसस्थानकावरून रविवारी सकाळी साडेसात वाजता "साथ चल' उपक्रमाला प्रारंभ होईल. हडपसरमधील गाडीतळ येथे त्याचा समारोप होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 Poolgate