#SaathChal झेंडेवाडीत शिक्षकांकडून वारकऱ्यांची मसाज सेवा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 July 2018

गराडे - झेंडेवाडी येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून मसाज सेवेचा उपक्रम चालू आहे. या वर्षी सात हजार वारकरी लोकांची मसाज दोनशे शिक्षकांनी केली. दिवे घाटाचे अतिशय अवघड असे चढण चढून आल्यानंतर या ठिकाणी मसाजची जी सेवा मिळाली यामुळे खूप आराम मिळाला असल्याची प्रतिक्रिया वारकरी मनोहर फडतरे यांनी दिली. झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे सवाई गार्डन रेस्टॉरंट येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकरी मसाज शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्‌घाटन योगगुरू पंतप्रधान पुरस्कारविजेते डॉ. विश्‍वासराव मांडलिक यांनी केले.

गराडे - झेंडेवाडी येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी गेल्या सात वर्षांपासून मसाज सेवेचा उपक्रम चालू आहे. या वर्षी सात हजार वारकरी लोकांची मसाज दोनशे शिक्षकांनी केली. दिवे घाटाचे अतिशय अवघड असे चढण चढून आल्यानंतर या ठिकाणी मसाजची जी सेवा मिळाली यामुळे खूप आराम मिळाला असल्याची प्रतिक्रिया वारकरी मनोहर फडतरे यांनी दिली. झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथे सवाई गार्डन रेस्टॉरंट येथे योग विद्याधाम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने वारकरी मसाज शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्‌घाटन योगगुरू पंतप्रधान पुरस्कारविजेते डॉ. विश्‍वासराव मांडलिक यांनी केले. या वेळी भोर उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पवार, सरपंच मीना झेंडे, उपसंरपच समीर झेंडे, संगीता काळे, सागर काळे, संगीता खटाटे, बाबूराव गोळे, सारिका झेंडे, अजित गोळे आदी उपस्थित होते. सवाई गार्डनच्या वतीने मोफत चहा व सर्व शिक्षकांची जेवणाची सोय करण्यात आली होती. योग विद्याधाम पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष योग शिक्षक प्रमोद निफाडकर यांनी शिबिराचे संयोजन केले, तर उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष दशरथ जगताप यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari Teacher Massage to Varkari