आषाढी पालखीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

पुणे - पंढरपूर आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठीची तयारी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागांना दिले आहेत. त्यामध्ये आरोग्य सेवा, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, गॅस आणि रॉकेल पुरवठा वेळेत होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतून तर संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान देहू येथून सहा जुलै रोजी होणार आहे. संत सोपानकाका महाराज पालखी सासवडहून प्रस्थान करणार आहे. या पालख्या पुणे आणि सातारा जिल्ह्यांतून पंढरपूर येथे 22 जुलै रोजी पोचणार आहेत.

पालखी सोहळ्याचे समन्वयक विशेष भूमी संपादन अधिकारी यू. डी. भोसले म्हणाले, 'पालखीच्या काळात वारकऱ्यांना आरोग्य सुविधा वेळेत मिळण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत. वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, गॅस आणि रॉकेलपुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.''

प्रमुख तीन पालखी सोहळ्याचे आणि इतर पालख्यांचे प्रमुख यांच्याशी चर्चा करून आवश्‍यक ती कार्यवाही करावी, पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमपत्रिकेप्रमाणे मुक्कामाच्या ठिकाणांची नोंद घेण्यात यावी आदी सूचना संबंधितांना केल्या आहेत.
- दीपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wari aashadhi wari palkhi sohala administrative