Pune News : पगारापोटी प्रति विद्यार्थी दरमहा सव्वा लाखांचा खर्च

वेल्हे तालुक्यातील झेडपी शाळांची स्थिती : अचानक तपासणीतून उघड
2 lakh per student per month for salary Status of ZP Schools in Velhe Revealed surprise inspection
2 lakh per student per month for salary Status of ZP Schools in Velhe Revealed surprise inspectionesakal

पुणे : वेल्हे तालुक्यातील पानशेतजवळ एकाच मार्गावर असलेली घिवशी आणि आंबेगाव बुद्रुक ही दोन गावे. या दोन्ही गावांसाठी प्रत्येकी एक जिल्हा परिषदेची स्वतंत्र शाळा. या दोन्ही शाळांसाठी मिळून तीन शिक्षक कार्यरत.

पण या तीन शिक्षकांसाठी या दोन्ही शाळांमध्ये मिळून अवघे दोनच विद्यार्थी. त्यातही हे दोन्ही विद्यार्थी आंबेगाव बुद्रुक या एकाच गावातील. यामुळे शेजारील घिवशी गावातील शाळेचे शिक्षक आंबेगाव शाळेतील दोनपैकी एका विद्यार्थ्याला केवळ उपस्थितीमुळे स्वत:च्या दुचाकीवरून घेऊन जात आहेत.

ही काल्पनिक कथा किंवा अख्यायिका नव्हे तर, विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेबाबतची सत्यकथा आहे. ही सत्यकथा जिल्हा परिषदेच्या तपासणी पथकाने या शाळांना अचानक दिलेल्या भेटीतून उघडकीस आली आहे. यानुसार पुणे जिल्हा परिषद या शाळांवरील फक्त शिक्षकांच्या पगारापोटी प्रति विद्यार्थी सुमारे सव्वा लाख रुपयांचा खर्च करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तपासणी पथकाने याबाबतचा तपासणी अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला असून त्याची एक प्रत सकाळला प्राप्त झाली आहे. या तपासणी अहवालातून ही वस्तुस्थिती समोर आली आहे. मात्र याबाबत भाष्य करण्यास कनिष्ठ पातळीपासून वरिष्ठ पातळीपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.

बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील (आरटीई) प्रति २० विद्यार्थ्यांमागे १ शिक्षक असणे आवश्यक आहे. वेल्हे तालुक्यातील विविध १३ शाळांमध्ये मिळून फक्त १०५ विद्यार्थी आणि या शाळांवर एकूण २६ शिक्षक कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. त्यातही या शाळा दुपारी तीन वाजण्याच्या आतच सोडून दिल्या जात असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले आहे.

या सर्व शाळा पानशेत परिसरातील आहेत. या शाळांना अचानक भेटी देण्यासाठी विविध तीन पथके स्थापन करण्यात आली होती. यापैकी एका पथकाने घिवशी, आंबेगाव बुद्रुक, चिमकोडी, वडघर आणि शिर्केवाडी, दुसऱ्या पथकाने सुतारवाडी, देशमुखवाडी, पडाळवाडी व वरसगाव तर, तिसऱ्या पथकाने कुरण बुद्रुक या गावची वरचीवाडी, मधलीवाडी आणि कुरण बुद्रुक या शाळांची तपासणी केली.

प्रति विद्यार्थी सरासरी दरमहा २० हजारांचा खर्च

दरम्यान, या तेरा शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी केवळ शिक्षकांच्या पगारापोटी प्रति विद्यार्थी दरमहा २० हजार रुपये खर्च केले जात आहे. कारण विद्यार्थी व शिक्षक संख्येचे प्रमाण पाहता प्रति शिक्षक विद्यार्थी असल्याचे दिसून आले आहे. एका शिक्षकाचा दरमहा पगार हा किमान ८० हजार रुपये इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com