पुणे : गावठी पिस्तुलासह एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

धरण चौक परिसरात एका व्यक्ती कारमधून आला असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

खडकवासला : धरण चौक परिसरात एका व्यक्ती कारमधून आला असून त्याच्याकडे गावठी पिस्तुल असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांना गावठी पिस्तुल संदर्भात माहिती मिळाली होती.
त्यानुसार हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला, धरण चौक, सिंहगड रस्त्यावर दत्तात्रय शिवाजी मते (वय 45 वर्षे रा.खडकवासला) कारमधून आला. त्याला कारसह ताब्यात घेवून त्यांच्याकडील बेकायदा, विनापरवाना व बेकायदेशीर कोणत्या तरी हेतुने जवळ गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस असा एकूण दोन लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 

मते यांच्याविरोधात यापूर्वी हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पुढील कारवाईसाठी हवेली पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार दत्तात्रय गुंड, सहायक फौजदार दयानंद लिमण पोलिस हवालदार रवि शिनगारे, महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलिस नाईक ज्ञानेश्वर क्षिरसागर, पोलिस शिपाई अक्षय जावळे यांनी केलेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 person arrested with pistol at Khadakwasla