

पुणे - पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पीएमपी ताफ्यात नुकत्याच १२ मीटर लांबीच्या १० ई-बस दाखल झाल्या असून, येत्या आठवडाभरात आणखी ४० ई-बस येणार आहेत. या ई-बस बीआरटी मार्गांवर धावणार आहेत, अशी माहिती पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत शहरात ५०० इलेक्ट्रिक बस घेण्यात येणार आहेत. दोन टप्प्यांत या बस खरेदी करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात १५० आणि नंतर ३५० ई-बस घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील १५० ई-बसपैकी २५ ई-बस ९ मीटर लांबीच्या असून, त्या फेब्रुवारी महिन्यात ताफ्यात दाखल झाल्या आहेत. यासाठी निगडी आणि भेकराईनगर या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. मात्र, बीआरटी मार्गावर धावणाऱ्या ई-बस अद्याप ताफ्यात दाखल झाल्या नव्हत्या. आता या ई-बस शहरात दाखल होण्यास सुरवात झाली असून, आठवडाभरात पहिल्या टप्प्यातील पन्नास ई-बस येणार आहेत.
बारा मीटर ई-बसची वैशिष्ट्ये
संपूर्ण वातानुकूलित
दोन्ही बाजूला दरवाजा
बीआरटी मार्गावर धावणार
सीसीटीव्ही कॅमेरे
सूचनेसाठी डिजिटल बोर्ड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.