
पुणे : भारत पाकिस्तान युध्दजन्य परिस्िथती निर्माण झाली असून अशा वेळी जर संभाव्य आपत्कालीन परिस्िथती निर्माण झाल्यास रुग्णालयांनी अशा वेळी रुग्ण भरती करण्यासाठी दहा टक्के खाटा (बेड) आरक्षित ठेवाव्यात, असे निर्देश महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांना दिले आहेत. याशिवाय, आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर, इमारतीतील संरचना सुरक्षित ठेवणे, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रतिसाद पूर्वसराव (मॉक ड्रिल्स) यांचा अंतर्भाव या बाबींचे पूर्व नियोजन करावे, असेही म्हटले आहे.