गिर्यारोहकांनी घडविला इतिहास; 'कांचनजुंग' केले सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गिर्यारोहकांनी घडविला इतिहास; 'कांचनजुंग' केले सर

कांचनजुंगा शिखर चढाईसाठी तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. या पार्श्‍वभूमीवर गिर्यारोहकांनी केलेली कामगिरी स्पृहणीय आहे. एकाच संस्थेतील दहा सदस्यांनी खडतर मोहीम यशस्वी करणे हे गिर्यारोहणाच्या इतिहासात प्रथमच घडत आहे. 

- उमेश झिरपे, कांचनजुंगा मोहिमेचा नेता 

गिर्यारोहकांनी घडविला इतिहास; 'कांचनजुंग' केले सर

पुणे : गिरीप्रेमी संस्थेच्या 10 गिर्यारोहकांनी बुधवारी कांचनजुंगा शिखरावर यशस्वी चढाई करून भारतीय गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय जोडला. खडतर आव्हानाचा सामना करत या गिर्यारोहकांनी पहाटे साडेपाच ते सहा या कालावधीत कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवले. 

ही अभिमानस्पद कामगिरी करणाऱ्यांमध्ये आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ठोकळे, डॉ. सुमीत मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर, जितेंद्र गवारे यांचा समावेश होता. उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली गिरीप्रेमी संस्थेने सातवी अष्टहजारी मोहीम फत्ते केली. या पद्धतीचे यश संपादन करणारी गिरीप्रेमी ही एकमेव नागरी संस्था ठरली असून, झिरपे एकमेव मोहीम नेते ठरले आहेत. 

गिरीप्रेमींच्या दहा गिर्यारोहकांसह जगभरातील 20 गिर्यारोहक हे शिखर सर करत होते. यातील 21 गिर्यारोहकांना शिखर सर करण्यात यश आले. 

माउंट कांचनजुंगाविषयी 
उंची ः 8586 मीटर 
- माउंट एव्हरेस्ट आणि माउंट "के 2'नंतर उंचीनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर 
- भारतातील सर्वांत उंच शिखर 
- कांचनजुंगावर एकूण पाच शिखरे, मुख्य शिखर 8586 मीटर, पश्‍चिम शिखर 8,505 मीटर, मध्य शिखर 8482 मीटर, दक्षिण शिखर 8494 मीटर, कांगबाचेन शिखर 7,903 मीटर 

चढाईचे मार्ग 
भारताकडून : कांचनजुंगा वे झेमू ग्लेशियरच्या बाजूने (हा मार्ग सध्या बंद) 
नेपाळकडून : यालुंग ग्लेशियर मार्गे (गिरीप्रेमींची चढाई याच मार्गाने) 

या मार्गातील आव्हाने

-बेस कॅम्पची उंची ः 5475 मीटर 
-कॅम्प 1 ः अंदाजे 6 हजार मीटर 
-कॅम्प 2 ः अंदाजे 6300 मीटर 
-कॅम्प 3 ः अंदाजे 6900 मीटर 
-कॅम्प 4 ः अंदाजे 7500 ते 7700 मीटर.

loading image
go to top