

Khadakwasla Dam water release update 2026
Sakal
Khadakwasla Water Release: खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजवा कालव्यातून १७ फेब्रुवारी ते १३ जून या कालावधीत शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी दोन उन्हाळी आवर्तने सोडण्यात आली.
या आवर्तनांदरम्यान एकूण ११६ दिवसांत १०.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे पुणे जिल्ह्यातील सिंचनासह ग्रामीण व शहरी भागांच्या पाणीपुरवठ्याची गरज भागविण्यास मोठी मदत झाली.