Talegaon Station News : १०० मीटरचे काम, वाहतूक मात्र दिवसभर जाम; चाकण एमआयडीसीतील भांबोली ते चाकण रस्त्यावर वाहतूक कोंडीचा शुक्रवार

आंबेठाण येथील केवळ १०० मीटरच्या रस्ते कामासाठी शुक्रवारी (ता.२९) रहदारी अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळाली.
Traffic jam in talegaon station

Traffic jam in talegaon station

sakal

Updated on

तळेगाव स्टेशन - आंबेठाण येथील केवळ १०० मीटरच्या रस्ते कामासाठी शुक्रवारी (ता.२९) रहदारी अन्य मार्गाने वळविण्यात आल्याने शुक्रवारी प्रचंड वाहतूक कोंडी पहायला मिळाली. नियोजनाप्रमाणे काम तर झाले नाही मात्र ,शेकडो वाहनचालकांसह एमआयडीसीतील कामगार आणि स्थानिक रहिवाश्ना दिवसभर वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com