पुणे शहरात उभारणार १०० स्मार्ट बसथांबे 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याचा एक भाग म्हणून शहरात विविध भागांत १०० ठिकाणी स्टेनलेस स्टीलचे नवे बसथांबे एका महिन्यात उभारण्यात येणार आहेत. मोडकळीस आलेल्या बसथांब्यांच्या जागेवर नवे थांबे उभारण्यात येणार आहेत. त्यातील सहा थांब्यांचे लोकार्पण गुरुवारी झाले.  

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

प्रवाशांना उन्हाळा, पावसाळ्यात सुरक्षिपतणे उभे राहता येईल, यासाठी ‘स्मार्ट’ बसथांबे उभारण्याचे पीएमपी प्रशासनाने ठरविले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींशीही संपर्क साधला आहे. एका बसशेडसाठी सुमारे तीन लाख रुपये इतका खर्च आहे. खासदार अनिल शिरोळे यांनी स्थानिक विकास निधीतून पीएमपीला तीन कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातून हे १०० थांबे शिवाजीनगर, टिळक रोड, बिबवेवाडी, सिंहगड रोड, शिवाजीनगर, विमाननगर, औंध, बाणेर, वडगाव शेरी, येरवडा, कोथरूड, शास्त्रीनगर, वारजे, पद्मावती, सहकारनगर आदी भागांत उभारण्यात येणार आहेत. पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, ‘‘नवे बसथांबे स्टेनलेस स्टीलचे असून त्यांची लांबी २० फूट बाय ५ फूट आहे. त्यात किमान १३ प्रवाशांना बसता येईल. दिव्यांगांसाठी तीन फूट जागा मोकळी सोडली आहे. थांब्यावर बॉक्‍स टाइप छत असेल.’’ फर्ग्युसन रस्त्यावरील नव्या बसथांब्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात लोकार्पण खासदार शिरोळे यांच्या हस्ते झाले. या वेळी नगरसेविका नीलिमा खाडे, स्वाती लोखंडे तसेच दत्ता खाडे, राम म्हेत्रे, किरण ओरसे, नंदू मंडोरा आदी उपस्थित होते.

Web Title: 100 smart bus stops in city