Chandrakant Patil: पुणे पोलिस दलात लवकरच एक हजार जणांना घेणार; चंद्रकांत पाटील यांची माहिती
Pune Police: सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या २०,००० पोलिस उमेदवारांपैकी १,००० जणांना पुणे पोलिस दलात लवकरच नियुक्त केले जाणार आहे, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी एकत्र काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पुणे/सिंहगड रस्ता : पोलिस भरतीत निवड झालेल्या वीस हजार उमेदवारांचे सध्या प्रशिक्षण सुरू असून, लवकरच त्यापैकी किमान एक हजार प्रशिक्षणार्थींना पुणे शहर पोलिस दलात सहभागी करून घेतले जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.