शिवतीर्थ नगर, रामबाग कॉलनीत कोरोनाचा कहर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जुलै 2020

कोरोनाने सगळ्या पुण्यात धुमाकूळ घातलेला असताना ग्रीन झोन मध्ये असलेल्या कोथरुड मध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्याही पुढे पोहचली आहे. कोथरुडमधील आजवरची कोरोनाग्रस्तांची संख्या 1058 इतकी झाली असून 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 702 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून कोरोनावर उपचार सुरु असणारांची संख्या 339 इतकी आहे.

कोथरुड (पुणे) : कोरोनाने सगळ्या पुण्यात धुमाकूळ घातलेला असताना ग्रीन झोन मध्ये असलेल्या कोथरुड मध्ये आता कोरोनाग्रस्तांची संख्या हजाराच्याही पुढे पोहचली आहे. कोथरुडमधील आजवरची कोरोनाग्रस्तांची संख्या 1058 इतकी झाली असून 17 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 702 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले असून कोरोनावर उपचार सुरु असणारांची संख्या 339 इतकी आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांची संख्या 1594 आहे. कोथरुडमध्ये शिवतीर्थ नगर, रामबाग कॉलनी प्रभाग क्रं. 11 मध्ये सर्वाधिक म्हणजे 496 रुग्ण आढळले आहेत.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

या प्रभागातील केळेवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण आहेत. त्याखालोखाल कोथरुड डेपो, बावधन प्रभाग क्रं. 10 मध्ये 303 रुग्ण आढळले आहेत. यातील शास्त्रीनगर परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी, पीएमसी कॉलनी या वस्तीभागात जास्त रुग्ण आढळले आहेत. तीच परिस्थिती मयूर कॉलनी, डहाणूकर कॉलनी प्रभाग क्रं. 12 मधील लक्ष्मीनगर या वस्ती भागात जास्त रुग्ण आढळले आहेत. सोसायटी भागात सुध्दा कोरोना रुग्ण आढळत असले तरी त्यावर नियंत्रण करणे वस्तीच्या तुलनेने सोपे जाते. मात्र, वस्तीभागात लोकसंख्या दाट असल्याने झपाट्याने संसर्ग वाढ होत आहे. वस्तीभागात विविध राजकीय पक्षांनी प्रतिकारशक्ती वाढविणा-या गोळ्यांचे वाटप केले आहे. परंतु हे वाटप करताना अनेकदा सोशल डिस्टन्स पाळण्याचा विसर पडलेला दिसतो.

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र करुन कोरोना संसर्गाला पूरक वातावरणाची संधी दिल्यामुळे कोरोना वाढला नाही ना अशी शंका जाणकार विचारत आहेत. लोकांच्या आरोग्याची काळजी न घेता जे वाटप सुरु आहे त्यावर कठोर नियंत्रण आणण्याची गरज आहे. सध्या कोथरुडच्या मायक्रो कंटेनमेंट परिसरातील रस्ते पत्रे लावून बंद केले आहेत. परंतु त्यामुळे या भागातील रुग्ण संख्या कमी झाल्याचे दिसत नाही. सरकारने सोमवारपासून पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याचे जाहीर केल्याने कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख कमी होईल का हे लवकरच समजेल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1058 person affected by corona in kothrud